aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध दारू विक्रीवर नांदेड पोलिसांचा घणाघात 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत

Aawaz Times by Aawaz Times
January 24, 2026
in क्राईम
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : २४ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 लाख 10 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नांदेड शहरात सुरू असलेल्या हिंद-दी-चादर या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री बंदीचे आदेश दिले असतानाही काही इसम अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर), मा. श्री. सूरज गुरव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर व्यंजने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.45 वाजता, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सिंगन भवन समोर, सार्वजनिक रोडवर सापळा रचून छापा टाकला. यावेळी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईत देशी भिंगरी दारूच्या 302 सीलबंद बाटल्या (किंमत 20,160 रुपये) तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला महिंद्रा इलेक्ट्रिक कंपनीचा ऑटो (किंमत 3,90,000 रुपये) असा एकूण 4,10,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी

  1. एजाज खान जफर खान (वय 50, व्यवसाय मजुरी, सुंदर नगर, नांदेड)
  2. नितीन किशन गायकवाड (वय 32, व्यवसाय मजुरी, प्रभात नगर, नांदेड)
    यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 43/2026 अंतर्गत कलम 65(ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, व नरेश वाडेवाले तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नागनाथ चापके करीत आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ऐतिहासिक ‘हिंद की चादर’ समागमाच्या सुरक्षेची धुरा डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे

Next Post

अनैतिक संबंधातून सासूचा निर्घृण खून सुनेसमवेत चार आरोपी अटकेत हदगावमध्ये खळबळ

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

अनैतिक संबंधातून सासूचा निर्घृण खून सुनेसमवेत चार आरोपी अटकेत हदगावमध्ये खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved