aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अनैतिक संबंधातून सासूचा निर्घृण खून सुनेसमवेत चार आरोपी अटकेत हदगावमध्ये खळबळ

Aawaz Times by Aawaz Times
January 25, 2026
in क्राईम
0
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हदगाव नांदेड २५ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
हदगाव तहसील कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर कार्यरत असलेल्या विधवा महिलेचा तिच्याच सुनेने प्रियकर व इतर साथीदारांच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाने हदगावसह शेजारील उमरखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हदगाव शहरातील गौतम नगर येथे राहणाऱ्या कमलाबाई गंगाधर क्षीरसागर (वय ५४) या विधवा होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा मद्यव्यसनामुळे लिव्हर खराब झाल्याने दोन महिन्यांपूर्वीच मरण पावला होता. त्यामुळे घरात सून सुनिता नागेश क्षीरसागर (वय ३५) ही एकटी राहत होती. या पार्श्वभूमीवर सासू-सुनेमध्ये सतत वाद होत असल्याचे परिसरात बोलले जात होते.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेचे बाहेरील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. या कारणावरून सासू-सुनेत तणाव वाढला होता. सासूच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी सुनिताने आपल्या प्रियकर परमेश्वर किशन वानखेडे (वय २६, रा. वटफळी ता. हिमायतनगर) यांच्या मदतीने सासूचा काटा काढण्याचा कट रचला.

ठरलेल्या नियोजनानुसार दिनांक १० जानेवारी रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास, गौतम नगर येथील घरामध्ये कमलाबाई गाढ झोपेत असताना सुनिता व तिचा प्रियकर यांनी स्कार्फने गळा आवळून त्यांचा खून केला. प्रारंभी हा मृत्यू संशयास्पद वाटत असताना, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज, मयताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास योग्य दिशेने गेला. तपासात हा खून संगनमताने केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सुनिता नागेश क्षीरसागर, तिचा प्रियकर परमेश्वर किशन वानखेडे, सुनेचा भाऊ अमोल लोभाजी इटकरे (वय ३८, रा. नागापूर ता. उमरखेड) तसेच प्रियकराचा नातेवाईक मित्र अक्षय नारायण कदम (वय २६, रा. निवघा बाजार ता. हदगाव) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

अनैतिक संबंधात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास हदगाव पोलीस करत असून या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अवैध दारू विक्रीवर नांदेड पोलिसांचा घणाघात 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत

Next Post

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारांवर मोठ्या होतात सचिन साठे

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारांवर मोठ्या होतात सचिन साठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved