aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलीस प्रशासनाची धडक कारवाई ८४ फटाका सायलेन्सर जप्त व नष्ट

Aawaz Times by Aawaz Times
March 24, 2026
in क्राईम
0
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २४ मार्च (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरामध्ये दुचाकी सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात ‘फटाका’ फोडणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या हुल्लडबाज वाहनचालकांविरुद्ध नांदेड पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जप्त करण्यात आलेले ८४ अनधिकृत सायलेन्सर आज २४ मार्च रोजी भररस्त्यात रोड रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक दुचाकी चालक कंपनीने दिलेले अधिकृत सायलेन्सर काढून त्याऐवजी कानठळ्या बसवणारे अनधिकृत सायलेन्सर लावून फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. या वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होता.
या प्रकाराची गंभीर दखल घेत नांदेड पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ८४ दुचाकींवर अनधिकृत बदल केलेले सायलेन्सर आढळून आले. पोलिसांनी हे सर्व सायलेन्सर जप्त करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. जप्त केलेले हे ८४ सायलेन्सर आज २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ४:३० च्या दरम्यान शहरातील महावीर चौक येथे रोड रोलरच्या साहाय्याने सर्वांसमोर नष्ट करण्यात आले.
अशीच मोहीम भविष्यातही सुरू राहणार:
अनधिकृत सायलेन्सर लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई इथवरच मर्यादित राहणार नसून, भविष्यातही अशा प्रकारे मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या मानकांनुसारच सायलेन्सर वापरावेत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वेंजने, श्री. श्याम पानेगांवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. उदय खंडराय, पो.नि. श्री. परमेश्वर कदम, पोहेकॉ वजीरबाद आणि शहर वाहतूक शाखेचे स.पो.नि. श्री. भागवत नागरगोजे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: भोकर फाटा व खुजडा शिवारात अवैध वाळू उपसा रोखला ४९ लाख ५०,००० हजार चा मुद्देमाल जप्त

Next Post

जुगार आणि मटका अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा १३ आरोपी जेरबंद दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

जुगार आणि मटका अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा १३ आरोपी जेरबंद दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved