aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

एलसीबीची लातूर फाटा परिसरात मोठी कारवाई, १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
June 14, 2026
in क्राईम
0
एलसीबीची लातूर फाटा परिसरात मोठी कारवाई, १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १४ जून (प्रतिनिधी, माधव वाघमारे)
नांदेड शहरात जबरी चोरी करून दुचाकी वाहने पळवणाऱ्या दोन अट्टल आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेडच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १,११,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई लातूर फाटा ते मामा चौक दरम्यान सापळा रचून करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील प्रलंबित आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ‘फ्लश आउट’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना देण्यात आले होते.
त्यानुसार, दिनांक १३ जून २०२६ रोजी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड आणि त्यांचे पथक नांदेड शहरातील लातूर फाटा परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, पोलीस पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मामा चौक ते विसर्जन जाणाऱ्या रोडवर तातडीने रणनीती आखून सापळा रचला.

दोन संशयित ताब्यात, चौकशीत गुन्हा कबूल

सापळा लावलेला असताना पोलिसांनी संशयास्पद रित्या जाणाऱ्या दोन इसमांना अडवून ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) गणेश राजाराम हिवराळे (वय २८ वर्ष, रा. शिवनगर, नांदेड)
२) ज्ञानेश्वर नारायण ढगे (वय ५५ वर्ष, रा. सैलानी नगर, नांदेड)
दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी काही दिवसांपूर्वी नाईक नगर येथे ऑटोमधून उतरून पायी जाणाऱ्या एका महिलेचे पर्स जबरीने ओढून पोबारा केल्याची कबुली दिली. त्या पर्समध्ये चांदीचे दागिने होते. तसेच, या घटनेनंतर त्यांनी अण्णा भाऊ साठे चौकातून एक पॅशन प्रो मोटारसायकल चोरल्याचेही कबूल केले. हे सर्व चोरीचे दागिने आणि मोटारसायकली विक्री करण्यासाठी घेऊन जात असतानाच पोलीस पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

१ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • चांदीचे दागिने: जुनी वापरती किंमत अंदाजे १५,०००/- रुपये.
  • लाल रंगाची स्कूटी: (क्र. MH 20 EX 0047) जुनी वापरती किंमत अंदाजे ६०,०००/- रुपये.
  • काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटारसायकल: (क्र. MH 26 BH 5522) जुनी वापरती किंमत अंदाजे ३६,०००/- रुपये.
  • एकूण जप्त किंमत: १,११,०००/- रुपये.
    या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं २६४/२०२६ कलम ३०४(२) BNS आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं २५९/२०२६ कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हे नोंदवून आरोपींना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही धडक कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि साईनाथ पुयड व एलसीबीचे पोलीस अंमलदार इम्रान शेख, मिलिंद नरबाग प्रमोद जोंधळे, बालाजी कदम, संदीप घोगरे, संतोष बेल्लुरोड, महेश बडगु तसेच सायबर सेलचे राजू सिटीकर व दिपक ओढणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण एलसीबी पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

स्टेट बँक कॅश फ्रॉडमधील फरार आरोपीचा राजस्थानमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved