aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत जुगार अड्डयावर छापा २८ आरोपींवर गुन्हा दाखल तर १८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
June 14, 2026
in क्राईम
0
ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत जुगार अड्डयावर छापा २८ आरोपींवर गुन्हा दाखल तर १८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १४ जून

(विमानतळ पोलीस स्टेशन) नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत कडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्डयावर धाडसी छापा टाकून पोलिसांनी तब्बल २८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल असा एकूण १८,७१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

मनोरंजन केंद्राच्या नावाखाली चालत होता जुगार

मिळालेल्या माहितीनुसार, गाडेगाव रोड, कामठा शिवार (नांदेड) परिसरातील जगनलाल यादव यांच्या जागेत काही इसम शासन अधिकृत मनोरंजन केंद्राचा परवाना असल्याचे भासवत होते. मात्र, प्रत्यक्षात तिथे मनोरंजनाचे खेळ न खेळता अवैध रितीने ‘पपलू’ नावाचा पत्त्यांचा जुगार पैशावर खेळत आणि खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) श्री. रामेश्वर वैंजने आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे व त्यांच्या पथकाने १३ जून २०२६ रोजी रात्री २०:३० वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. १४ जून रोजी पहाटे ०४:३८ वाजता याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७४/२०२६ नुसार कलम ४, ५ म.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:

  • जुगाराचे साहित्य व एकूण ३२० प्लास्टिक कॉईन
  • २० नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन
  • ०८ मोटार सायकली
  • ०२ चारचाकी कार (गाड्या)
    एकूण जप्त किंमत: १८,७१,०००/- रुपये

या आरोपींवर झाली कारवाई

कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपींसह एकूण २८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. प्रामुख्याने शुभम संजयसिंह ठाकुर (रा. गाडीपुरा नांदेड), विजयसिंह करणसिंह ठाकुर, सत्यनारायण विजयसिंह बैस, सोमेश्वर कोंडीबा आचमारे (रा. शिवनगर नांदेड), प्रकाश जळबाजी जमदाडे (रा. पूर्णा, जि. परभणी), शेख शफी शेख मोईन, सोनु संजयसिंह ठाकुर, कुंदन प्रकाश सुर्यतळ (रा. आंबेडकर नगर), राजुसिंह ग्यानसिंह ठाकुर, मोहम्मद गौस मोहम्मद आसीफ, विक्रमसिंह तारासिंह परमार, अदनान अली नासेर अली (रा. पिरबुऱ्हाण) यांच्यासह इतर १६ आरोपींचा यामध्ये समावेश आहे. या गुन्ह्याचा फिर्यादी विमानतळ पोलीस ठाण्याचे पोउपनि मोहम्मद साजीद हुसेन यांनी दिला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक

कोपीही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा.श्री. सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वैंजने यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत विमानतळ पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे, पोउपनि श्री. सचिन शिंदे, पोउपनि श्री. साजीद हुसेन, वजीराबाद पो.स्टे.चे पोउपनि श्री. सुनील बुलंगे आणि विमानतळ, वजीराबाद व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अंमलदार शेख जावेद, पोवळे, पाकलवाड, राठोड, शेख शोएब, भुसे, मठपती, कदम, कड्ढनवार, झंपलवाड, लांडगे व क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.
या धडक आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि लोखंडे हे करत आहेत.
वृत्त संकलन व बातमी: प्रतिनिधी – माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

Next Post

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीतील ३ महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात नांदेड पोलिसांची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीतील ३ महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात नांदेड पोलिसांची मोठी कारवाई

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीतील ३ महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर एलसीबीच्या जाळ्यात नांदेड पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved