aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

लोह्यात पत्नीवर गोळ्या झाडून पसार झालेला आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
July 10, 2026
in क्राईम
0
लोह्यात पत्नीवर गोळ्या झाडून पसार झालेला आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड /लोहा १० प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. विशाल सुरेश जाधव (वय २५ वर्ष, रा. शिक्षक कॉलनी, लोहा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा (अग्निशस्त्र) जप्त करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून झाडल्या होत्या गोळ्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी रात्री २३.०० वाजताच्या सुमारास लोहा येथील शिक्षक कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. फिर्यादी अर्चना विशाल जाधव (वय १९ वर्ष) हिचा पती विशाल सुरेश जाधव याने घरगुती कारणावरून वाद घातला. त्यानंतर फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आपल्या हातातील बंदुकीतून (गावठी कट्टा) अर्चना यांच्या पाठीत व डोक्यात गोळ्या झाडल्या आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पोलीस स्टेशन लोहा येथे गु.र.नं २३९/२०२६ कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ८५ भा.न्या.सं. सह कलम ३/२५ भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आणि पथकांची नियुक्ती
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांना आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पो.नि. अतुल भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली.
गुपचूप रचला सापळा; आनंद सागर परिसरातून अटक
लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेला आरोपी पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, १० जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रवि वाहुळे व त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी विशाल जाधव हा नांदेड शहरातील विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद सागर, मंगल कार्यालय परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या परिसरात वेगाने हालचाली करत सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्या संदर्भाने कसून विचारपूस केली असता, त्याने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त केला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह लोहा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
यांनी केली कारवाई:
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री.डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा.श्री. सुरज गुरव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा.श्री. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईत सपोनि श्री. रवि वाहुळे, पोउपनि माधव केंद्रे, बळीराम दासरे, पोहेकॉ देविदास चव्हाण, पोकॉ मोतीराम पवार, पोहेकॉ दिलीपकुमार चंचलवार, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, चालक पाहेकॉ सिद्धार्थ सोनसळे, पोकॉ महेश बडगु, तसेच सायबर सेलचे पोहेकॉ राजू सिटीकर, दिपक ओढणे आणि मपोहेकॉ रेश्मा पठाण यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
– वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सोनखेड पोलिसांची मोठी कारवाई ४५ लाख २५ हजारांच्या मुद्देमालासह विना क्रमांकाचा हायवा टिप्पर आणि अवैध रेती जप्त

Next Post

ढवळे कॉर्नर परिसरात १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
ढवळे कॉर्नर परिसरात १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ढवळे कॉर्नर परिसरात १ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved