aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई २१ आरोपींवर गुन्हे दाखल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
July 29, 2026
in क्राईम
0
नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई २१ आरोपींवर गुन्हे दाखल ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
132
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २९ जुलै प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापे मारून २१ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹६,००,२००/- (सहा लाख दोनशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई: हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक

२८ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक येथे काही इसम ‘कल्याण मटका’ व पाना-पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांच्या पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.
या कारवाईत १६ आरोपींना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले:
१) वाजिद खान रमजान खान (वय ३४, रा. देगलूर नाका)
२) साजिद शहा मेहबूब शहा (वय ३३, रा. देगलूर नाका)
३) मो. सुलेकार मो. यूनूस (वय ४२, रा. मोबीनपुरा)
४) पिरसाब सत्तार शेख (वय ५०, रा. लोहा)
५) शेख हबीब शेख शेरा (वय ४६, रा. खुदबेनगर)
६) सय्यद मुसा सय्यद असाक (वय ४१, रा. रहमतनगर)
७) मागसुद खान इसहाक खान (वय ४७, रा. खुसरोनगर)
८) शेख मुजीब शेख खाजा (वय ३७, रा. गाडीपुरा)
९) शेख अन्सान शेख अमीन (वय ५६, रा. इक्बाल नगर)
१०) नासीर खान समशेर खान पठाण (वय ६४, रा. नुरी चौक)
११) शेख शकील शेख इस्माईल (वय ४६, रा. मदिना नगर)
१२) शेख शब्बीर शेख पाशा (वय ३५, रा. पाकिस्तानगर)
१३) मोहसीन खान रहीम खान (रा. नांदेड)
१४) अबू उर्फ जमीर (रा. नांदेड)
१५) शार्दूल उर्फ छिलटा (रा. नांदेड)
१६) मुजाहिद शेठ (रा. नांदेड)
त्यांच्याकडून ₹१३,०००/- रोख, ₹५९,०००/- किमतीचे ९ मोबाईल फोन आणि मटका-जुगाराचे साहित्य असा एकूण ₹७२,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२०/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: दिक्षानगर, बळीरामपूर

२८ जुलै २०२६ रोजी रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास दिक्षानगर, बळीरामपूर येथील पाण्याच्या टाकीलगतच्या मोकळ्या जागेत ‘तिरट’ नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पथकाने छापा टाकला.
येथून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले:
१) तुषार विश्वंभर गजभारे (वय ३०, रा. धनेगाव)
२) चंदर पिराजी गाडे (वय ३५, रा. बळीरामपूर)
३) अमोल मधुकर आठवले (वय ३४, रा. नविन कौठा)
४) शिवाजी ज्ञानोबा दासरवाड (वय ३१, रा. बळीरामपूर)
५) राहुल हरीहरराव गवााले (वय ४६, रा. धनेगाव)
या ठिकाणाहून ₹४,२००/- रोख, ₹७९,०००/- किमतीचे ५ मोबाईल फोन आणि ₹४,४५,०००/- किमतीच्या ३ दुचाकी वाहने (होंडा शाईन, पॅशन प्रो व बुलेट) असा एकूण ₹५,२८,२००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र.नं. ९१९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, बाबुराव चव्हाण तसेच पोलीस अंमलदार दिलीप, शेख असीफ, शिवानंद कानगुले, जेंकुट, कांबळे, बेग, जाधव, धम्मानंद कांबळे आणि देवडे यांनी पार पाडली.
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नगारवाडीच्या जायभाये कुटुंबाचा सेंद्रिय शेतीतील ‘यशस्वी पॅटर्न जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून कौतुक

Next Post

महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात

महात्मा फुले हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved