aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
August 3, 2026
in क्राईम
0
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी : माधव वाघमारे (नांदेड)
नांदेड ३ ऑगस्ट
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भाग्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी भाग्यानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, हायवा टिपर (क्रमांक MH 26 CH 5959) मधून चैतन्य नगर ते तरोडा रोड मार्गाने विनापरवाना अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित वाहन रोखले.
वाहनाच्या चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मल्कार्जुन व्यंकटी एलके (वय ३३ वर्ष, रा. ब्राह्मणवाडा, ता. जि. नांदेड) असे सांगितले. वाहनातील रेतीबाबत त्याच्याकडे आवश्यक परवाना किंवा रॉयल्टीची कागदपत्रे मागितली असता, तो कोणताही वैध दस्तऐवज सादर करू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून ५ ब्रास रेती (अंदाजे किंमत २०,००० रुपये) आणि हायवा टिपर (अंदाजे किंमत २०,००,००० रुपये) असा एकूण २०,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी भाग्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२) सह कलम ४८(७)(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भाग्यानगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक महेश माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, शरदचंद्र सावरे, कांबळे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, नांदेड जिल्हा पोलीस अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

Next Post

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved