नांदेड १७ सप्टेंबर (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सन्मानाने सलामी देऊन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना आणि सैनिकांना भावपूर्ण अभिवादन केले.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, प्रशांत थोरात, अमित राठोड तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा आयुक्त एस. बी. खुणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, खराडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी अतिशय प्रभावीपणे केले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.












