aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
September 23, 2026
in क्राईम
0
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २३ सप्टेंबर(प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिवरोडवरील संकेतनगर पाटीजवळ रस्त्यावर सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकून ६ जुगार्‍यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रकमेसह वाहने आणि मोबाईल असा एकूण ३,०६,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई:

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सरकारी वाहनाने गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिवरोडवरील संकेतनगर पाटीजवळ काही व्यक्ती सार्वजनिक रस्त्यावर लाईटच्या उजेडात विनापरवाना बेकायदेशीररीत्या पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत. या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळी अचानक छापा टाकला असता ६ इसम पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१) दीपक सुभाष येवतीकर (वय ३० वर्षे, व्यवसाय: मार्केटिंग, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) २) विनोद किशनराव खांडरे (वय ३९ वर्षे, व्यवसाय: व्यापार, रा. स्वस्तिकनगर, शिवरोड, नांदेड) ३) ओमकार बालाजी बैनवाड (वय २७ वर्षे, व्यवसाय: इंजिनीअर, रा. मंत्रीनगर, नांदेड) ४) सचिन अशोक नागरगोजे (वय ४५ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) ५) शशांक लक्ष्मण गबाळे (वय २४ वर्षे, व्यवसाय: शिक्षण, रा. निलेश्वरी कॉलनी, शिवरोड, नांदेड) ६) विनायक मधुकर मिरकुटे (वय २६ वर्षे, व्यवसाय: शिक्षण, रा. खंडोबा चौक, नांदेड)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

  • नगदी रक्कम: ₹६,९३०/- रोख
  • मोबाईल: विविध कंपन्यांचे ६ मोबाईल
  • वाहने: ३ दुचाकी (ॲक्टिव्हा स्कूटी क्र. MH-26-BP-8321, होंडा शाईन क्र. MH-26-AN-6192, होंडा युनिकॉर्न क्र. MH-26-VH-9104)
  • इतर: बदक छाप जुगाराचे पत्ते (एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹३,०६,९३०/-)

गुन्हा दाखल व पोलीस पथक:

सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४४/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही धडक कारवाई मा. डॉ. निलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) व मा. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोनि/ संतोष तांबे, पोलीस उपनिरीक्षक/ विनोद देशमुख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार पवार, विष्णुकांत मुंडे, चापके, काष्टेवाड, साळवे व होमगार्ड कदम यांनी पार पाडली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यात अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची परस्पर वारंवार विक्री करून कोट्यवधी रुपयांना गंडा
क्राईम

बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची परस्पर वारंवार विक्री करून कोट्यवधी रुपयांना गंडा

September 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved