aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, November 10, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Aawaz Times by Aawaz Times
November 10, 2026
in क्राईम
0
उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) दि १० नोव्हेंबर

नांदेड शहरात दुचाकीवरून येऊन नागरिकांना भररस्त्यात अडवून, मारहाण व खंजिराचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि महागड्या दुचाकी चोऱ्या करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करण्यात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी बोंडार-हवेली रोडवरील उसाच्या शेतात अत्यंत शिताफीने सापळा रचून व पाठलाग करत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोरीचे गुन्हे व विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६ दुचाकी चोरीचे गुन्हे असे एकूण ८ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ६ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

कशी झाली कारवाई

शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांचे पथक दिनांक ०९/११/२०२६ रोजी नांदेड शहर व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करत गुन्हेगारांचा माग काढत होते. दरम्यान, पोलीस पथकाला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, चैतन्यनगर रोडवरील जबरी चोरीतील मुख्य संशयित आरोपी अमेरखान उर्फ एमके आणि शेख रेहान हे चोरीची दुचाकी विकण्याच्या उद्देशाने बोंडार-हवेली रोड लगतच्या उसाच्या शेताजवळ थांबलेले आहेत.

या माहितीच्या आधारे पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दोन पंचनामे सोबत घेऊन संध्याकाळच्या सुमारास बोंडार-हवेली रोडवरील उसाच्या शेताजवळ सापळा रचला. पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच दोन्ही सराईत आरोपींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांचा तात्काळ पाठलाग करून पथकाने झडप घालून त्यांना जागीच ताब्यात घेतले.

जेरबंद करण्यात आलेले आरोपी:

१. अमेरखान उर्फ एमके उर्फ जिहादी (वय २३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. इरफाननगर, गाडेगाव रोड, नांदेड) २. शेख रेहान उर्फ चिल्ला शेख महेबुब (वय १९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मिल्लतनगर, नांदेड)

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण व कसून चौकशी केली असता, त्यांनी आपले इतर साथीदार ऋषी वाठोरे, शेख गौस आणि कुणाल आंदे यांच्या मदतीने दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

उघडकीस आलेले जबरी चोरीचे गुन्हे

  1. चैतन्यनगर रोड जबरी चोरी: दोन दिवसांपूर्वी चैतन्यनगर रोडवर चोरीच्या मोटरसायकलवरून येऊन एका व्यक्तीला मारहाण करत त्याच्या हातातील अंगठी लुटून नेली होती. (गु.र.नं. ६५४/२०२६ कलम ३०९ (६), ३११, ३(५) भा.न्या.सं. सह कलम ४/२५ भा.ह.का.)
  2. आसना ब्रिज जबरी चोरी: दिनांक ०७/११/२०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रभू काळाबा मोरे (वय ६० वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा. गौतमनगर, सांगवी बु., नांदेड) हे आपल्या घरातून मोटारसायकलवर भाजीपाला आणण्यासाठी इतवारा येथे जात होते. दरम्यान, आसना ब्रिजजवळ आरोपींनी आपली दुचाकी आडवा लावून फिर्यादीच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करत, खंजिराचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख ५,२००/- रुपये जबरीने हिसकावून नेले होते (पो.स्टे. विमानतळ गु.र.नं. ५६१/२०२६).

जप्त केलेल्या मोटारसायकल व गुन्ह्यांची माहिती

पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलबाबत सखोल विचारपूस केली असता, आरोपींनी सहयोगनगर (नांदेड), नरसी, बडूरफाटा (बिलोली), खुदबेनगर, कामठा माळ टेकडी आणि स्वयंवर मंगल कार्यालय अशा विविध ठिकाणांहून ६ दुचाकी चोरल्याचे सांगितले. सर्व ६ चोरीच्या दुचाकी बोंडार-हवेली रोड लगत उसाच्या शेताशेजारील दाट झाडाझुडपात लपवून ठेवल्या होत्या. अ.क्र.पोलीस स्टेशनगु.र.नं. व कलमवर्णनअंदाजे किंमत १भाग्यनगर६५५/२०२६ कलम ३०३(२) BNSबजाज कंपनीची मो.सा.७०,०००/- २रामतीर्थ२३०/२०२६ कलम ३०३(२) BNSबजाज पल्सर-२२०७०,०००/- ३भाग्यनगर६५९/२०२६ कलम ३०३(२) BNSबजाज पल्सर-२२०७०,०००/- ४विमानतळ५६२/२०२६ कलम ३०३(२) BNSहिरो स्पलेंडर४५,०००/- ५बिलोली२५०/२०२६ कलम ३०३(२) BNSयेज्दी रोडस्टर२,५०,०००/- ६नांदेड ग्रामीण१४३८/२०२६ कलम ३०३(२) BNSरॉयल एनफिल्ड१,००,०००/-

दोन्ही ताब्यात घेतलेल्या आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मार्गदर्शन व पोलीस पथक

सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे, पोउपनि/माधव केंद्रें, गुंडेशराव करले, दिलीपकुमार चंचलवार, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, ब्रम्हांडाम लामतुरी, रितेश कुलथे, रवि बामणे, चंद्रकांत स्वामी, शेख अजहर, सिद्धार्थ सोनसळे तसेच सायबर सेल येथील राजेन्द्र सिटीकर व दिपक ओढणे यांच्या पथकाने केली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक
क्राईम

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved