aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक रस्त्यावर मारामारी करणाऱ्या युवकांवर विमानतळ पोलिसांची कडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
December 30, 2025
in क्राईम
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड :३० डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कडक पावले उचलली जात आहेत. त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर आपसात मारामारी करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

माननीय श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर, माननीय श्री. सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड आणि श्री. रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे (पोलीस स्टेशन विमानतळ) यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्री. संतोष जोंधळे, तसेच पोलीस कर्मचारी तेलंगे, शेख जावेद, राजू कांबळे, सोमनाथ पत्रे, राजेश माने, शेख टाकलवाड व इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच नांदेड शहरातील बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालये व क्लासेस परिसरात सतत पोलीस गस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. महिलांची छेडछाड करणारे, स्टंटबाजी करणारे तसेच सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीतील आनंदनगर भागात काही युवकांनी किरकोळ कारणावरून सार्वजनिक रस्त्यावर आपसात मारामारी करून झुंज दिल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला.

तपासात सहभागी युवकांची ओळख पटवून त्यांना दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तनिष्क विनोद राठोड (वय १८, रा. बेलानगर तरोडा, नांदेड), कार्तिक रामदास मालदोडे (वय १९, रा. वैजापूर, ता. मुदखेड, जि. नांदेड), अमन राजेश वाठोरे (वय १८, रा. अंबानगर, सांगवी बुद्रुक, नांदेड), हर्ष सुनील नरवाडे (वय १८, रा. कुर्तडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांचा समावेश असून इतर तीन विधीसंघर्षित बालकांचाही यात समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची मारामारी, दहशत निर्माण करणारे प्रकार अथवा शांतता बिघडविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा नांदेड पोलीस प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी खर्चावर करडी नजर

Next Post

महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान पत्रकारास झालेल्या वर्तणुकीबाबत चौकशीची मागणी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान पत्रकारास झालेल्या वर्तणुकीबाबत चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved