aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

पोटच्या मुलानेच रचला घरफोडीचा कट मैत्रिणीच्या मदतीने घरातील ९ लाख ७० हजार लुटले, नांदेड पोलिसांची ४८ तासांत मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
July 1, 2026
in क्राईम
0
पोटच्या मुलानेच रचला घरफोडीचा कट मैत्रिणीच्या मदतीने घरातील ९ लाख ७० हजार लुटले, नांदेड पोलिसांची ४८ तासांत मोठी कारवाई
0
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  १ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक घरफोडीचा छडा लावण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या दोन दिवसांत यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीच्या स्वतःच्या मुलानेच आपल्या मैत्रिणीसोबत मिळून हा घरफोडीचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतले आहे.

देवदर्शनाचे निमित्त साधून डल्ला

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंब २६ जून २०२६ रोजी देवदर्शनासाठी बाहेर जाणार होते. हीच संधी साधून फिर्यादीचा मुलगा शुभम कौठकर याने आपल्या मैत्रिणीला (विधिसंघर्षग्रस्त बालिका) घराच्या कुलुपाची अतिरिक्त चावी कुठे ठेवली आहे, याची पूर्वकल्पना दिली. तसेच घरात प्लॉट खरेदीसाठी मोठी रोकड ठेवली असल्याची माहितीही त्याने तिला दिली होती.
ठरलेल्या कटानुसार, कुटुंब बाहेर जाताच संबंधित बालिकेने अतिरिक्त चावीचा वापर करून घरात प्रवेश केला आणि लोखंडी पेटीत ठेवलेली ९ लाख ७० हजार रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला.

अशी झाली गुन्ह्याची उकल

घरफोडीची घटना समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. शिलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.
संशयावरून फिर्यादीचा मुलगा शुभम कौठकर याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. शुभमच्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरी गेलेल्या रकमेपैकी ९ लाख ३६ हजार ६०० रुपये रोख हस्तगत केले.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि नागनाथ तुकडे, सपोउपनि दारासिंग राठोड, पोलीस अंमलदार मोहन हाके, महेश बडगु, ब्रह्मानंद लामतुरे, शिलराज ढवळे, शितल सोळंके, लहू चाटे आणि आबाराव पिंगलवाड यांनी केली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
बातमी प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस दलातील ३५ अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त भावुक वातावरणात निरोप

Next Post

नांदेड महानगरपालिकेत राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा मनपातील डॉक्टरांचा विशेष सन्मान

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post
नांदेड महानगरपालिकेत राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा मनपातील डॉक्टरांचा विशेष सन्मान

नांदेड महानगरपालिकेत राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा मनपातील डॉक्टरांचा विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved