aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, April 13, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, April 13, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

दामिनी पथकाची मोठी कामगिरी

Aawaz Times by Aawaz Times
April 11, 2026
in क्राईम
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ एप्रिल (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ९ व १० एप्रिल २०२६ रोजी नांदेड शहरातील विविध भागांत धाडसी कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या २३ जणांवर, तर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या २ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

विभागांनुसार झालेली कारवाई:

१. भाग्यनगर परिसर (शस्त्र जप्ती):
‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ पथकाने पेट्रोलिंग दरम्यान क्लासेस परिसरात दोन इसमांना संशयास्पदरीत्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी खंजर हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच परिसरातील वाईन शॉप आणि हॉटेलची तपासणी करण्यात आली.
२. वजीराबाद व शिवाजीनगर परिसर:
वजीराबाद येथील फटाका ग्राउंड आणि बसस्थानक परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या ४ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच शिवाजीनगर येथील ज्योती टॉकीज रोड परिसरातही मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. दामिनी पथकाची कामगिरी:
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या ‘दामिनी पथकाने’ आनंदनगर, शिवमंदिर, हनुमान मंदिर आणि हडको परिसरात पेट्रोलिंग करताना १५ जणांना सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालताना पकडले. या सर्वांवर विमानतळ व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा

नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत ताकीद दिली आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करू नये किंवा मद्यप्राशनासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. अशा प्रकारांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्यास संबंधित व्यक्तींवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, पथक प्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे, पोउपनि दर्शने आणि चार्ली पोलीस अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कारवाईमुळे शहरातील टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026
क्राईम

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट ५ दिवसांत ९७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

April 11, 2026
क्राईम

नांदेड पोलिसांचे शहरात धाडसी कोंबिंग ऑपरेशन ४ दिवसांत ८८ सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

April 10, 2026
क्राईम

धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई दुचाकी चोरट्यास अवघ्या काही तासांत ठोकल्या बेड्या

April 9, 2026
क्राईम

नांदेड हादरले पोलीस कोठडीत असतानाच रुग्णालयात पुन्हा हल्ला कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांचे निलंबन

April 8, 2026
Next Post

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved