aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
May 20, 2026
in क्राईम
0
नांदेडमध्ये ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत मोठी कारवाई
0
SHARES
175
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  २० मे ( प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडक कारवाई करत तब्बल ७२.०३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिट्टा) आणि एक स्कुटी असा एकूण ४ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

नांदेड कोर्ट ते हिंगोली गेट जाणाऱ्या बायपास रोडवर अमृतसर (पंजाब) येथून आलेली एक महिला अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रवि वाहुळे यांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून कायदेशीर प्रक्रियेसह या परिसरात तात्काळ छापा मारण्यात आला.

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर दोन साथीदारांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही पोलिसांनी अटक केली. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) राजविंदर कौर जर्मनजितसिंग महाल (वय ३८ वर्ष, रा. दुरीया, जि. अमृतसर, पंजाब)
२) गुरमुखसिंग उर्फ गुरी सेवकसिंग गिल (वय २८ वर्ष, रा. गुरूद्वारा गेट नं. ६, शहिदपुरा, नांदेड)
३) अमनप्रितसिंग उर्फ मनी जगजीतसिंग वेदी (वय ३० वर्ष, रा. गुरूद्वारा गेट नं. ०२, नांदेड)
४) जनार्धन उर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के (वय ३१ वर्ष, रा. ब्राम्हणवाडा, ता. जि. नांदेड)

४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • अमली पदार्थ (ब्राऊन शुगर/चिट्टा): ७२.०३ ग्रॅम (किंमत रु. ३,६०,१५०/-)
  • वाहन: एक विना नंबरी ॲक्टिव्हा स्कुटी (किंमत रु. १,१०,०००/-)
  • रोख रक्कम: नोटांच्या पुंगळ्या केलेले १२०/- रुपये.
    (एकूण जप्त मुद्देमाल: ४,७०,२७०/- रुपये)

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले, सपोनि रवि वाहुळे, आणि त्यांच्या पथकातील पोउपनि दासरे, पोहेकॉ देवीदास चव्हाण, दिलीप चंचलवार, ज्ञानोबा कवठेकर, रितेश कुलथे, उमर शेख, मपोहेकॉ शितल सोळंके, पोकों मोतीराम पवार, चापोहेकॉ सिद्धार्थ सोनसळे तसेच खंडणी विरोधी पथकातील पोहेकॉ शिलराज ढवळे, ब्रम्हानंद लामतुरे, प्रदिप गर्दंनमारे, व्यंकट गंगुलवार, राजवंतसिंग बुंगाई, चापोकों हेमंत बिचकेवार आणि सायबर सेलचे राजू सिटीकर व दिपक ओढणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महोदयांनी संपूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. याप्रकरणी पुढील तपास वजीराबाद पोलीस करत आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ऑपरेशन यात्री सुरक्षा नांदेड रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई तीन अट्टल चोरट्या गजाआड ४२ हजारांचे मोबाईल जप्त

Next Post

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी काला इलू’ तेलंगणातून गजाआड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी काला इलू’ तेलंगणातून गजाआड

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी काला इलू' तेलंगणातून गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved