aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आरोग्य

पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन

Aawaz Times by Aawaz Times
October 5, 2025
in आरोग्य
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


दिनांक : ५ ऑक्टोबर २०२५

नांदेड, दि. ४ : जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच साथीचे आजार टाळण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत.

या आरोग्य शिबिरांना दि. ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पूरग्रस्त भागांमध्ये ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३७७ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

३ ऑक्टोबर रोजी ४५ गावांमध्ये, तर ४ ऑक्टोबर रोजी १५ गावांमध्ये आरोग्य शिबिरे घेण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी आणखी ७ गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या शिबिरांमध्ये ३,९०० ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची विशेष तपासणी करण्यात आली.

या शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, कीटकजन्य व जलजन्य आजार, पोटदुखी, ताप, उलटी, अतिसार, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांची तपासणी करून उपचार व जनजागृती करण्यात आली.

आरोग्य विभागातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी ग्रामस्थांना परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचे साठे कोरडे करणे, नाल्यांना वाहते ठेवणे आणि शुद्धीकरण केलेले पाणी वापरणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दरम्यान, अर्धापूर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर शिबिराला आमदार श्रीमती जया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी भेट देऊन पूरग्रस्त जनतेशी संवाद साधला. त्यांनी सर्व आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

ही शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. श्रीकांत देसाई, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

Next Post

नांदेड पोलिसाची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ
आरोग्य

नांदेड जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ

June 28, 2026
नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य

नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयुष्यमान आरोग्य शिबिर संपन्न

May 6, 2026
आरोग्य

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जिल्ह्यातून केले एलतडीपार

March 29, 2026
आरोग्य

Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन कार्यान्वित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पाहणी

December 18, 2025
आरोग्य

शिबिरात ८५ महिलांची आरोग्य तपासणी

September 22, 2025
आरोग्य

प्रतिज्योत संस्थेचे जुने सहकारी माझे स्नेही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल गायकवाड सर यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले लेख सर आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻💐

September 6, 2025
Next Post

नांदेड पोलिसाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved