aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, April 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, April 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात जमीन हादरली – दोन सौम्य धक्क्यांची नोंद, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे

Aawaz Times by Aawaz Times
October 13, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड प्रतिनिधी : १४ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात  दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासल्यावर या धक्क्यांची कुठलीही नोंद नसल्याचे आढळून आले. मात्र अधिक सूक्ष्म तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना याबाबत सखोल माहिती घेण्यास सांगण्यात आले.

आज दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी डॉ. विजयकुमार यांनी अभ्यास करून दिलेल्या अहवालानुसार, विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 15:57 तास व सायंकाळी 20:58 तास या दोन वेळा सौम्य भूकंपीय धक्क्यांची नोंद झाली आहे. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 1.9 व 2.3 एवढी नोंदविण्यात आली असून यांचा केंद्रबिंदू खैरगाव परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ. विजयकुमार यांनी सांगितले की, हे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असून यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अशा प्रकारचे कंपन हे बहुधा अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण किंवा उपशामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. देशातील अनेक भागांत दरवर्षी अशा स्वरूपाच्या घटना घडतात. तसेच “गूढ आवाज” येणे हीसुद्धा स्थानिक स्वरूपातील बाब असल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

तहसीलदार नायगाव यांनीदेखील या धक्क्यांमुळे कोणतीही हानी झालेली नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

दरम्यान, मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्यांच्या घरांचे छत पत्र्याचे आहे आणि ज्यांनी आधारासाठी पत्र्यावर दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित ते दगड काढून सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रे बोल्टने घट्ट बसवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील काळात पुन्हा असा आवाज किंवा धक्का जाणवल्यास नागरिकांनी शांततेने मोकळ्या जागेत जावे आणि प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा. यासाठी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राचा दूरध्वनी क्रमांक (02462) 235077 असा जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना “अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाशी संपर्कात राहा” असे आवाहन केले आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शरदचंद्र पवार विधी महाविद्यालय, नांदेड येथे भव्य पदवी वितरण, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

Next Post

नांदेड जिल्ह्यातील एकूण 130 घनाचे आरक्षण निश्चित

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी नागरसोल  चेन्नई एक्सप्रेसच्या वेळेत बदल दुपारी १:३० ऐवजी आता ५ वाजता सुटणार

April 20, 2026
आपलं नांदेड

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने कौठा येथे अभिवादन

April 19, 2026
आपलं नांदेड

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर काकीनाडा टाऊन ते हिसार दरम्यान धावणार विशेष समर स्पेशल ट्रेन

April 19, 2026
आपलं नांदेड

देगलूर नाका दुर्घटना त्या निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची गय करणार नाही महापौरांचा संतप्त इशारा

April 18, 2026
आपलं नांदेड

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी ४६ लाखांचे ३०३ चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत

April 18, 2026
आपलं नांदेड

नांदेडच्या विकास कामांना गती द्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून कौतुक

April 17, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यातील एकूण 130 घनाचे आरक्षण निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात पोलिसांचे मोठे कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले ९ दिवसांत ११९ जणांवर कारवाई

April 20, 2026

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी नागरसोल  चेन्नई एक्सप्रेसच्या वेळेत बदल दुपारी १:३० ऐवजी आता ५ वाजता सुटणार

April 20, 2026

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने कौठा येथे अभिवादन

April 19, 2026

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर काकीनाडा टाऊन ते हिसार दरम्यान धावणार विशेष समर स्पेशल ट्रेन

April 19, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved