aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

Aawaz Times by Aawaz Times
September 24, 2026
in क्राईम
0
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी २४ सप्टेंबर माधव वाघमारे

नांदेड: आगामी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पाडाव्यात, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कडक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘2+ स्कीम’ (दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची स्वतंत्र यादी) प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, दिनांक 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुका डोळ्यासमोर ठेवून नांदेड जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सतर्क झाले आहे. उत्सवाचा पूर्वइतिहास आणि कायदा-सुव्यवस्थेची संवेदनशीलता लक्षात घेऊन, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आणि उपद्रवी घटकांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163 अन्वये धडक प्रतिबंधक मोहीम राबवण्यात आली आहे.

विशेष मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

  • महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशान्वये प्राप्त विशेषधिकाऱ्यांचा वापर करून ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी श्रीमती अर्चना पाटील व मा. सुरज गुरव यांनी हाती घेतली आहे.
  • संपूर्ण जिल्ह्यातून विविध पोलीस ठाण्यामार्फत एकूण 828 इसमाविरुद्ध कलम 163 अन्वये प्रतिबंधक प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, नांदेड विभागातील 468 तर भोकर विभागातील 360 समाजकंटकांवर गावात थांबण्यास बंदी घालणारे अंतिम मनाई आदेश पारित करण्यात आले आहेत.
  • यामध्ये गावात अवैध दारू विक्री, जुगार किंवा इतर अवैध धंदे चालवून किरकोळ कारणावरून वाद, मारहाण व दहशत निर्माण करणारे घटक तसेच मिरवणूक मार्गावर जाणीवपूर्वक घोषणाबाजी, धक्काबुक्की अथवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा पूर्वइतिहास असलेले इसम तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न दाखवणाऱ्यांवर थेट गावात येण्यास अथवा थांबण्यास मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.

पोलीस ठाणेनिहाय हद्दपार करण्यात आलेल्यांची आकडेवारी:

  • वजिराबाद: 50
  • शिवाजीनगर: 35
  • भाग्यनगर: 50
  • इतवारा: 55
  • नांदेड ग्रामीण: 50
  • उस्माननगर: 09
  • देगलूर: 25
  • मुखेड: 09
  • मरखेल: 20
  • नायगाव: 92
  • रामतीर्थ: 33
  • कύνर: 40
  • अर्धापूर: 74
  • मुदखेड: 16
  • भोकर: 15
  • हदगाव: 50
  • उमरी: 29
  • कुंडलवाड: 52
  • माहूर: 20
  • सिंदखेड: 52
  • किनवट: 32
  • इस्लापूर: 10
  • लिंबगाव: 10
  • एकूण: 828

ज्या व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अन्वये अंतिम मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत, त्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी संबंधित गावात किंवा मिरवणूक परिसरात प्रवेश करू नये अथवा थांबू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमनातील तरतुदींनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी शांतता राखून उत्सव साजरा करावा आणि संशयास्पद हालचाली दिल्यास तात्काळ जवळच्या पोलीसेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved