नांदेड, दि. 11 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश-आउट मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी चोरीतील दोन मोटारसायकलींसह एक सराईत आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईचे जिल्हा पोलीस दलाकडून कौतुक होत आहे.
घटनेचे सविस्तर वर्णन :
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, गुन्हा क्र. 316/2025 अंतर्गत पोलिसांची पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन श्रास्तीनगर परिसरात विक्रीसाठी थांबलेला आहे.
पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या बसलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपले नाव सलमान खान नेम खान (वय 22, रा. तेरानगर, नांदेड) असे सांगितले.
चोरीचे गुन्हे कबूल
त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल संदर्भात विचारणा केली असता सदरील वाहन हे रामानंद नगर साई मंदिर येथून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील चौकशीत त्याने मगनपुरा परिसरातून अजून एक मोटारसायकल चोरी केल्याचेही सांगितले.
पथकाने आरोपीकडून एकूण दोन मोटारसायकली, किंमत सुमारे 50,000 रुपये, जप्त केल्या. नोंदींच्या तपासात दोन्ही मोटारसायकलींबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
- माननीय श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
- सौ. अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर
- श्री सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड
- श्री रामेश्वर व्यंजने, पोलीस अधिकारी, नांदेड शहर
- श्री राजेश पुरी, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर
कारवाई करणारे अंमलदार : पद्मसिंग कांबळे, अनिल झांबरे, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी यादगिरवाड
पोलिस अधीक्षकांकडून कौतुक
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक माननीय श्री अबीनाश कुमार यांनी श्री माननीय राजेश पुरी यांच्यासह पथकातील सर्व अंमलदारांचे विशेष कौतुक केले.
शिवाजीनगर पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीमुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.












