aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाचा धडाका सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
January 21, 2026
in क्राईम
0
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २१ जानेवारी प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या इसमांवर नांदेड पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सरजेराव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत ही कारवाई राबविण्यात आली.

दिनांक १९ व २० जानेवारी २०२६ रोजी शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरड, शिवीगाळ करून नागरिकांच्या शांततेस बाधा आणणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११० व ११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पेट्रोल पंप, जिल्हा मेहेर भवन परिसरात दारू पिऊन गोंधळ करणारे इसम मिळून आले. त्यांच्याकडून दारूची बाटली व साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण दोन इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील वाईन शॉप व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत विसावा गार्डन, अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या चार इसमांवर कारवाई करण्यात आली. संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करून दारू विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली.

वजिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत बिना नंबर वाहन चालवणाऱ्या एका इसमावर ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच वजिराबाद परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या नऊ इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील दोन सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दामिनी पथकाकडूनही कारवाई
विसावा गार्डन, वर्की चौक, सराफा लाईन परिसरात दारू पिऊन आरडाओरड करणाऱ्या नऊ इसमांवर शिवाजीनगर व फोर्ट इटवारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून, नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणे खपवून घेतले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाईसार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

Next Post

24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved