प्रतिनिधी :२० फेब्रुवारी माधव वाघमारे
नांदेड, दि. १९ फेब्रुवारी २०२६ : नांदेड शहरात दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सण-उत्सव शांततेत पार पडावेत, या उद्देशाने पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांतून एकूण ९५ प्रकरणे नोंदविण्यात आली. पोलिसांनी बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्या, कर्कश व मॉडिफाइड सायलेंसर (फटाका बुलेट) लावलेल्या, विनानंबर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करत संबंधित दुचाकी जप्त केल्या.
पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून जप्त केलेल्या वाहनांचा तपशील पुढीलप्रमाणे :
· पोस्टे शिवाजीनगर : १८ वाहने
· वजिराबाद : ०४ वाहने
· भाग्यनगर : २५ वाहने
· विमानतळ : १८ वाहने
· नांदेड ग्रामीण : १२ वाहने
· वजिराबाद सिरीबी : १७ वाहने
· इतवारा सिरीबी : ०१ वाहने
तसेच पोस्टे भाग्यनगर अंतर्गत दोन डीजे संचालकांवर गुन्हे दाखल करून जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. पोस्टे विमानतळ येथे दोन जणांवर आर्म अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.












