aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, March 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, March 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ११ जणांवर कारवाही व अल्पवयीन मुलांकडे खंजर जप्त

Aawaz Times by Aawaz Times
March 2, 2026
in क्राईम
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड, दि. २ मार्च – नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाने रविवारी (दि. १ मार्च) शहराच्या विविध भागात छापे टाकून एकूण ११ जणांवर कारवाई केली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.डी.सी. परिसरात पथकाने केलेल्या पेट्रोलिंग दरम्यान सहा जण दारू पिऊन गोंधळ घालताना आढळून आले. या सर्वांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११०/११७ अन्वये कारवाई करण्यात आली.

भाग्यनगर परिसरात पेट्रोलपंप तुलसी पेंट जवळ दोन इसम दारूच्या नशेत शांतता भंग करीत असताना पकडण्यात आले. यावेळी तपासणीदरम्यान दोन अल्पवयीन मुलांकडे खंजर आढळून आल्याने त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दामिनी पथकाने अशोकनगर भागात केलेल्या कारवाईत तीन जणांना आरडाओरड करून शांतता भंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले असून त्यांच्यावरही संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय पथकाने शहरातील विविध भागांतील दारू दुकाने, वाईन शॉप आणि हॉटेल्सची देखील तपासणी केली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये किंवा दारू पिणाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. शांततेचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

आरपीएफ नांदेडची प्रवासी सुरक्षेसाठी मोठी कारवाई नन्हे फरिश्ते व यात्री सुरक्षा अंतर्गत यश

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची रेती माफियांवर मोठी कारवाई  १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा दणका

March 22, 2026
क्राईम

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

March 21, 2026
क्राईम

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

March 21, 2026
क्राईम

किनवट पोलिसांची मोठी कारवाई पावणे दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो वाहन जप्त

March 19, 2026
क्राईम

बिलोलीत डी गँग चा गुंड जेरबंद दोन पिस्तूल जिवंत काडतुसे जप्त

March 19, 2026
क्राईम

नांदेडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई एकाच दिवसात ३८६ केसेस

March 19, 2026
Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची रेती माफियांवर मोठी कारवाई  १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा दणका

March 22, 2026

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

March 21, 2026

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

March 21, 2026

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved