aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेडक रांची तहान भागणार उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही महापौरांचे पाणीपुरवठा विभागाला अ‍ॅक्शन मोड वर राहण्याचे आदेश

Aawaz Times by Aawaz Times
May 5, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेडक रांची तहान भागणार उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही महापौरांचे पाणीपुरवठा विभागाला अ‍ॅक्शन मोड वर राहण्याचे आदेश
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ५ मे प्रतिनिधी
राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना नांदेड शहरात मात्र पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. “नांदेड शहरात पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये. वितरणातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवा,” असे सक्त निर्देश महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी दिले आहेत.
मंगळवार, ५ मे रोजी महापालिका मुख्यालयात पाणीपुरवठा विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

पाणी कपातीचे संकट टळले

बैठकीत पाणीपुरवठा विभागाने शहरातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. विष्णुपूरी धरणात यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, उपलब्ध पाण्याचे नियोजन चोख असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

गळती रोखा आणि दाबाने पुरवठा करा

शहरातील जलवाहिन्यांमध्ये होणारी गळती हा चिंतेचा विषय असून, दुरुस्ती कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः नवीन वसाहती आणि ज्या भागात कमी दाबाने पाणी येते, तिथे तांत्रिक उपाययोजना करून पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी उपसा केंद्रांवर परिणाम होऊ नये, यासाठी ‘महावितरण’शी समन्वय राखण्याचे निर्देश शहर अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना दिले.

अमृत २.० योजनेवर भर

आगामी काळात ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा केल्या जाणार आहेत. कौठा भागातील मीटर यंत्रणेचा प्रायोगिक आढावा घेऊन तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

“नांदेडकरांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कोणत्याही प्रभागातून तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. प्रशासनाने २४ तास तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय ठेवावी.
सौ. कविता संतोष मुळे, महापौर, नांदेड.

नागरिकांना आवाहन:
प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असतानाच, नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा. पिण्याचे पाणी बागेसाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वापरू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅक डाऊन भाग्यनगर गुन्हे शोध पथकाकडून अवैध शस्त्रे जप्त दोन आरोपी जेरबंद

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा ५ आरोपींना अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा ५ आरोपींना अटक

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा ५ आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved