aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी स्ट्रीट सेफ्टी आणि दामिनी पथका ची शहरात मोठी मोहीम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा कडक इशारा

Aawaz Times by Aawaz Times
May 23, 2026
in क्राईम
0
सिटी स्ट्रीट सेफ्टी आणि दामिनी पथका ची शहरात मोठी मोहीम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा कडक इशारा
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड: २३ मे प्रतिनिधी

नांदेड शहरात सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या आणि दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत दोन दिवसांत तब्बल १७ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा (मपोका) कलम ११०/११७ प्रमाणे कडक कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे टवाळखोर आणि दारुड्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे व ‘चार्ली’ पोलीस अंमलदार यांनी दिनांक २१ आणि २२ मे रोजी नांदेड शहरातील विविध भागात ही रात्रीची गस्त व तपासणी मोहीम राबवली.
शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली कारवाई खालीलप्रमाणे आहे:

१) भाग्यनगर भाग (तरोडा नाका)

‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ पथकातील चार्ली क्रमांक १, २ आणि ३ मधील पोलीस अंमलदार तरोडा नाका परिसरात पेट्रोलिंग करत असताना, दोन इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मपोका कलम ११०/११७ नुसार कारवाई केली. तसेच या परिसरातील दारूची दुकाने, वाईन्स शॉप, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून शाळा, कॉलेज आणि क्लासेस परिसराला भेटी देऊन सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला.

२) नांदेड ग्रामीण (गोपाळ चावडी)

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळ चावडी येथे चार्ली क्रमांक १ आणि २ च्या पथकाला गस्तीदरम्यान एक इसम दारूच्या नशेत धिंगाणा घालताना आढळला. त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली. या भागातही हॉटेल आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसराची कडक तपासणी करण्यात आली.

३) शिवाजीनगर (ज्योती टॉकीज रोड)

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार्ली क्रमांक १ च्या पथकाने ज्योती टॉकीज रोडवर कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या ३ इसमांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले.

४) दामिनी पथकाची विसावा गार्डन व इतवारा भागात मोठी कारवाई

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘दामिनी पथका’नेही या मोहिमेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. दामिनी पथकातील अधिकारी व अंमलदार विसावा गार्डन, बरकत कॉम्प्लेक्स आणि इतवारा भागात पेट्रोलिंग करत असताना, तब्बल ११ इसम आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना मिळून आले. या सर्वांवर शिवाजीनगर आणि इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर कायदेशीर कारवाई निश्चित पोलीस अधीक्षकांचा इशारा

“नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, तसेच दारू पिणाऱ्यांसाठी बेकायदेशीर जागा उपलब्ध करून देऊ नये. नागरिकांनी सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच अत्यंत कडक कारवाई केली जाईल.”
अभिनश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड)

विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ७ वर्षांनंतर बेड्या नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Next Post

मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
Next Post
मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद

मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved