aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
May 29, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई
0
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २९ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत, पोलिसांनी तब्बल २४ सराईत आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यान्वये कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे नांदेडमधील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.

दोन वेगवेगळ्या टोळ्यांवर ‘मोक्का’चे अस्त्र

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्चस्वाच्या वादातून गंभीर गुन्हे घडले होते.

  • भाग्यनगर पोलीस ठाणे: दिनांक ०४/०४/२०२६ रोजी कॅनॉल रोडवरील ई-स्क्वेअरजवळ दोन गटांत वर्चस्वाच्या वादातून तिहेरी खून (Triple Murder) ची थरारक घटना घडली होती. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
  • विमानतळ पोलीस ठाणे दिनांक २६/०४/२०२६ रोजी आरोपींनी आपापसातील वर्चस्वाच्या वादातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते.
    हे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गंभीर गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने वेळोवेळी दखल घेऊनही या गुन्हेगारांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नव्हती. जामिनावर बाहेर येताच हे आरोपी पुन्हा गंभीर गुन्हे करत होते, ज्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी आणि कायदेशीर पाऊल

या टोळ्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९’ (मोक्का) अन्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मा. पोलीस उप महानिरीक्षक साहेब, नांदेड परिक्षेत्र यांनी या प्रस्तावाला २८ मे २०२६ रोजी मंजुरी दिली.

या २४ आरोपींवर झाली कारवाई

१. दिपक अर्जुन पवार (वय २४, शिवनगर)
२. रोहीत प्रकाश खिल्लारे (वय १९, तानाजीनगर)
३. आकाश गोविंदराव लुळे (वय २४, तानाजीनगर)
४. पप्पू उर्फ लालबा शेषराव गजलवाड (वय २२, गोपाळनगर)
५. राजेश अंकुश पवार (वय २०, तानाजीनगर)
६. अविनाश नारायण चव्हाण (रा. सखूजीनगर)
७. रोशन सुरेश हळदे (वय २२, गोविंदनगर)
८. प्रशीक उर्फ परश्या दिलीप ओढणे (वय २५, संघसेननगर, इतवारा)
९. चंद्रशेखर उर्फ चंध्या देवराव पाईकराव (वय २५, संघसेननगर, इतवारा)
१०. सोहेल उर्फ चिंधी फिरोजखान पठाण (वय २५, बालाजीनगर)
११. मोहम्मद तोफीक शेख संदलजी (वय २५, वजीराबाद)
१२. साईसिंग उर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (वय २६, सिडको)
१३. जयकुमार उर्फ सोनु कैलास राऊत (वय २३, सुमेध नगर)
१४. शाकेर खान रशीद खान (वय ३०, मिल्लत नगर)
१५. शेख शाहरूख उर्फ कबुतर शेख अजगर (वय २९, खुद्देनगर चौरस्ता)
१६. शेख उबेद शेख अजगर (वय २३, मिल्लत नगर)
१७. दिग्‍विजय गणेशराव नारगुडे (वय २२, शामनगर)
१८. मन्मथ वसंतराव मंगरुळे (वय २५, लालवंडी रोड, ता. नायगाव)
१९. नितेश परमेश्वर इंगळे (वय २२, शिवनगर)
२०. गौरव दिपकसिंग गहेरवार (वय ३०, शक्तीनगर)
२१. सय्यद आवेज सय्यद खलील (वय २७, खुद्देनगर चौरस्ता) (मयत)
२२. महंमद अरबाज महंमद फारुख (वय २३, इतवारा) (मयत)
२३. इलियास उर्फ काला इल्तुखान ईस्माईलखान (रा. खुद्देनगर चौरस्ता)
२४. शेख शाहरूख उर्फ हंटर, शेख जाफर (वय ३१, इतवारा)
(टीप: या यादीतील दोन आरोपी मयत आहेत.)

पोलीस प्रशासनाचा धडाका आणि इशारा

हा मोक्का प्रस्ताव यशस्वी करण्यासाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले व इतर अधिकारी-अंमलदारांची मोलाची साथ लाभली.

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत सराईत आणि संघटित गुन्हेगारांवर MPDA, MCOCA तसेच हद्दपारीसारखी कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम (Drive) सुरूच राहील. पोलीस प्रशासन, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

Next Post

निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून शुभेच्छांचा वर्षाव

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post
निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून शुभेच्छांचा वर्षाव

निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved