aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण व जबरी चोरी भाग्यनगर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

Aawaz Times by Aawaz Times
July 21, 2026
in क्राईम
0
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण व जबरी चोरी भाग्यनगर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  २० जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत रोख रक्कम व ऑनलाईन (PhonePe) व्यवहाराद्वारे पैसे लुटणाऱ्या टोळीचा भाग्यानगर गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत एका सराईत आरोपीसह तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेची पार्श्वभूमी व तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २.३० वाजेच्या दरम्यान यशवंत महाविद्यालय, नांदेड परिसरातून एका अल्पवयीन विद्यार्थ्याला आरोपींनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेले. तेथे त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली आणि मोबाईलद्वारे PhonePe वरून जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याने १९ जुलै २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून गु.र.नं. ३८५/२०२६, कलम ३०९(६), १३७(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास आणि धडक कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्याचे  अधिकारी श्री. संतोष तांबे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि/ विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेज, मोटरसायकल क्रमांक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
अवघ्या काही तासांत चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अथर्व अनिल गायकवाड (वय १९ वर्षे, रा. आंबेडकर नगर, नांदेड) याच्यासह तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

१००% मुद्देमाल जप्त

पोलीस पथकाने आरोपींकडून रोख रक्कम, PhonePe द्वारे लुटलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेले ३ मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल असा एकूण ₹१,३६,६३३/- (एक लाख छत्तीस हजार सहाशे तेहेतीस रुपये) किमतीचा १००% मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोउपनि/ विनोद देशमुख करत आहेत.

तपास पथक

ही उल्लेखनिनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली:

  • पोलीस निरीक्षक: श्री. संतोष तांबे, श्री. महेश माळी (गुन्हे)
  • पोलीस उपनिरीक्षक: विनोद देशमुख
  • पोलीस उप निरीक्षक नरेश वाडेवाले, विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे, सुधारकर मलदोडे, राजीव घुले, नागनाथ चापके, राहुल लाठकर, आदनान पठाण व अंकुश कांबळे यांनी पार पाडली.

पोलीसांचे आवाहन:
नांदेड जिल्हा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल, जबरिने पैसे उकळण्याचा प्रयत्न, अपहरण, मारहाण किंवा तत्सम घटना घडल्यास तात्काळ ११२ आपत्कालीन सेवा अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यास व आरोपींना त्वरित अटक करण्यास मदत होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

कंधार पोलिसांची धडक कारवाई ८.८८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त चारचाकीसह आरोपी ताब्यात

Next Post

विद्रोह शिक्षणाचा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
विद्रोह शिक्षणाचा

विद्रोह शिक्षणाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved