मुंबई / नांदेड १९ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील मतदार गणना अर्जांच्या (Enumeration Forms – EFs) वाटप आणि डिजिटायझेशनचा दैनिक अहवाल जारी करण्यात आला आहे. ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात १००% मतदार गणना फॉर्मचे वाटप यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४६ मतदारांपर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात आले आहेत. यापैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार ५८४ अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, टक्केवारीच्या दृष्टीने हे प्रमाण ७८.८४% इतके आहे. उर्वरित २१.१६% (सुमारे २ कोटी ७ लाख) अर्ज जमा होणे किंवा डिजिटाइज होणे बाकी आहे.
नांदेड जिल्ह्याची कामगिरी
नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण ३,०८८ BLO (बूथ लेव्हल ऑफिसर्स) मार्फत २७,७७,०७३ मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवण्यात आले असून, वाटपाची टक्केवारी १००% आहे.
- डिजिटाइज्ड झालेले अर्ज: २३,८८,९५१ (८६.०२%)
- उर्वरीत/संकलित करायचे अर्ज: ३,८८,१२२ (१३.९८%)
नांदेड जिल्ह्याने राज्याच्या सरासरीपेक्षा (७८.८४%) उत्तम कामगिरी नोंदवत ८६.०२% अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण केले आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांची स्थिती
- हिंगोली: ९१.२% Digitization (सर्वाधिक जलद काम करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक)
- परभणी: ८८.३१% Digitization
- लातूर: ८९.३% Digitization
- पुणे: ६८.३९% Digitization
- ठाणे: ६१.५९% Digitization
- मुंबई उपनगर: ६५.९७% Digitization
जिल्हाधिकारी तथा मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (ERO) मार्गदर्शनाखाली BLOs कडून हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. मतदारांची अचूक यादी तयार करण्यासाठी हे डिजिटायझेशन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
बातमी वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे












