नायगाव २७ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने २६ ऑगस्ट २०२६ च्या रात्री धडक कारवाई करत अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत ६,०१,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील: नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्तीवर असताना, नायगाव परिसरातील वडजे हॉस्पिटलजवळ अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित सापळा रचून संशयित कार (क्रमांक MH-12-NJ-2346) ची पंचानसमक्ष तपासणी केली.
तपासणीदरम्यान कारमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या एकूण ४७७ बाटल्या आढळल्या. यात McDowell’s, Classic Gold Whisky, Vulcan Blue Whisky, Masters Delight Whisky आणि Royal Stag या ब्रँड्सचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ₹१,०१,७९० असून, वाहतुकीसाठी वापरलेली कार (अंदाजे किंमत ₹५,००,०००/-) अशी मिळून एकूण ६,०१,७९० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
तीन आरोपींवर गुन्हा दाखल: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी खालील तीन आरोपींवर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
- विशाल बहादूरमल भंडारी (वय ४० वर्षे, रा. घूंगराळा, ता. नायगाव)
- संजय शंकर बानेवाड (रा. घूंगराळा, ता. नायगाव)
- गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव (रा. राणसुगाव, ह.मु. वडजे हॉस्पिटलजवळ, नायगाव)
या आरोपींविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 192/2026 कलम 65(अ) व 65(ड) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई: ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली उपविभाग) मा. श्याम पानेगावकर यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोउपनि गजानन तोटेवाड, पोउपनि बालाजी अंबुलगेकर, तसेच पोलीस अंमलदार सदाशिव पाटील, माधव पवार, दिपक शेरीकर, विनोद भंडारे आणि अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला.
वृत्त संकलन / प्रतिनिधी: माधव वाघमारे












