नांदेड १३ सप्टेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम मंडळात तब्बल ९७.५० मि.मी. इतकी अतिवृष्टी झाली असून उमरी मंडळात ६५.२५ मि.मी. मुसळधार पाऊस पडला आहे. जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत एकूण ५४५.१० मि.मी. पाऊस झाला असून, आजच्या तारखेपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या ७५.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय २४ तासांतील पर्जन्यमान (मि.मी. मध्ये):
- हिमायतनगर: ४६.८० मि.मी.
- भोकर: ३४.०० मि.मी.
- उमरी: ३४.०० मि.मी.
- धर्माबाद: २२.८० मि.मी.
- नायगाव खैर.: २२.२० मि.मी.
- किनवट: २०.६० मि.मी.
- मुदखेड: २०.२० मि.मी.
- हदगाव: १५.०० मि.मी.
- नांदेड: ११.५० मि.मी.
- लोहा: १०.६० मि.मी.
- बिलोली: ९.७० मि.मी.
- माहूर: ९.३० मि.मी.
- कंधार: ८.१० मि.मी.
- अर्धापूर: ६.५० मि.मी.
- मुखेड: ३.२० मि.मी.
- देगलूर: १.४० मि.मी.
अतिवृष्टी झालेली प्रमुख महसुली मंडळे (६५ मि.मी. पेक्षा जास्त):
- सरसम मंडळ (ता. हिमायतनगर): ९७.५० मि.मी.
- उमरी मंडळ (ता. उमरी): ६५.२५ मि.मी.
जिल्ह्याची एकूण पर्जन्यमान स्थिती:
- चालू वर्षातील एकूण पाऊस: ५४५.१० मि.मी.
- आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी: ७५.७६%
- वार्षिक एकूण सरासरीशी टक्केवारी: ६१.१६%
- मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस: ८८९.१० मि.मी. (१२३.५७%)
जिल्ह्यात पूर्व भागात मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे शेतातील पिकांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












