नांदेडमध्ये
नांदेड १३ सप्टेंबर प्रतिनिधी
नांदेड शहरातील वजीराबाद मार्केट परिसरात जुन्या गाडीच्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासांच्या आत तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी अक्षय लक्ष्मण डुबुकवाड (वय २०, रा. नवीन हस्सापूर भोई गल्ली, वाघी रोड, नांदेड) हे आपल्या मित्रासह वजीराबाद मार्केट परिसरातील नोव्हेल्टी दुकानासमोर उभे होते. यावेळी जुन्या गाडीच्या वादाचा राग मनात धरून आरोपी कार्तिक भगवान भिसे (रा. नांदेड) याने पाठीमागून येऊन अक्षय यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात अक्षय यांच्या उजव्या हातावर आणि पायावर गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रार क्र. ४६४/२०२६ कलम १०९(१) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने कारवाई नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वजीराबाद गुन्हे शोध पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणी शोध घेऊन फरार आरोपी कार्तिक भगवान भिसे (वय १८, रा. पंचशिलनगर, खडकपुरा, नांदेड) याला शिताफीने अटक केली.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी (P.C.R.) मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरनर करत आहेत.
तपास पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस ठाण्याचे पो.नि. अजित कुंभार यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. सुनिल बुलंगे, पोलीस अंमलदार शिवसाम मठपती, भाऊसाहेब राठोड, विलास कदम, इम्रान पठाण, संतोष पावडे, संतोष पोकळे, ज्वालासिंग बावरी आणि संतोष गोंदगे यांनी केली आहे.
प्रतिनिधी: माधव वाघमारे












