प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड दि ९ नोव्हेंबर
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधी विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कंधार ते उस्माननगर जाणार्या रोडवर असलेल्या मौजे मानसुरी शेतशिवातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर ‘तिर्रट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एकूण ₹४,०३,६२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी १५ जणांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती:
दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मानसुरी शेतशिवामध्ये काही इसम बेकायदेशीरपणे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून व आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
- रॉयल इन्फिल्ड बुलेट (MH-26-CZ-2697): अंदाजे किंमत ₹२,००,०००/-
- मोटारसायकल (MH-26-CD-6904): अंदाजे किंमत ₹६०,०००/-
- विविध कंपनीचे ७ मोबाईल फोन: अंदाजे किंमत ₹८९,१००/-
- रोख रक्कम: ₹५४,५२०/-
- जुगाराचे साहित्य
- एकूण जप्त मुद्देमाल: ₹४,०३,६२०/-
कारवाईत निष्पन्न झालेले आरोपी:
या कारवाईत एकूण १५ जण निष्पन्न झाले असून त्यामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे: १. शेख नूर मोहम्मद शेख बाबुमिया (वय २१, रा. बाहदरपूर, ता. कंधार) २. शेख रब्बानी शेख मौलाना (वय ५०, रा. हतईपुरा, कंधार) ३. मरीबा लक्ष्मण वाघमारे (वय ५२, रा. बळीरामपूर, ता. जि. नांदेड) ४. उत्तम दिगंबर गिरडे (वय ४२, रा. असदवन, ता. जि. नांदेड) ५. महेंद्र बळीराम कोल्हे (वय ४०, रा. संभाजी चौक, सिडको, नांदेड) ६. बालाजी धोंडीराम गोवंदे (वय ४०, रा. सुगाव, ता. जि. नांदेड) ७. शिवाजी बाबुराव ससाणे (वय ४०, रा. आनंद नगर, देगलूर) ८. अरुण गौतम लोहकरे (वय ३८, रा. वाघाळा, ता. जि. नांदेड) ९. देवीदास व्यंकटराव घोगरे (वय ४५, रा. असदवन, नांदेड) १०. अनिष कचरू घोगरे (वय ३९, रा. वाघाळा, नांदेड) ११. विजय पांढुरंग कोकरे (वय ४५, रा. कामळज, ता. मुखेड) १२. दिपक खैरे (रा. वाघाळा, नांदेड) – (फरार) १३. संग्राम मोरे (रा. गोपाळचावडी, नांदेड) – (फरार) १४. दादाराव जाधव (रा. हडको, नांदेड) – (फरार) १५. राजु शिवाजी इंगळेवाड (रा. वाघाळा, नांदेड) – (फरार)
या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२०/२०२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी:
सदर यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक मा. संदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/रवी वाहूळे, पउपनो/महेश कोरे, पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, मनोज राठोड, चापोकॉ/सुधाकर देवकते (सर्व नेमणूक स्थागुशा नांदेड) यांनी पार पाडली आहे. जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.











