aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

दोन जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणारा खुनाचा व दरोड्याचा फरार आरोपी जेरबंद

Aawaz Times by Aawaz Times
June 13, 2026
in क्राईम
0
दोन जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणारा खुनाचा व दरोड्याचा फरार आरोपी जेरबंद
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १३ जून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांना एक मोठे यश आले आहे. भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या आणि उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीला भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने परभणी येथून अटक केली आहे.
सूरज पि. सुनिल कदम (वय २२ वर्षे, रा. विनायकनगर, मराठा बारच्या मागे, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १७३/२०२६, कलम १०३(१), १०९, ३(५) BNS सह कलम ४/२५ भा.ह.का.) दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सूरज कदम हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.

परभणी रेल्वे स्टेशन परिसरातून आवळल्या मुसक्या

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले आणि त्यांचे पथक या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा माग काढत होते. दरम्यान, आरोपी सूरज कदम हा परभणी येथे असल्याची गुप्त आणि तांत्रिक माहिती पथकाला मिळाली. वरिष्ठांच्या आदेशाने पथकाने खाजगी वाहनाने तातभितेने परभणी गाठले. तेथे सापळा रचून परभणी रेल्वे स्टेशन परिसर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

तपासात दरोड्याचा गुन्हाही उघड

आरोपीला नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी व अधिक तपास केला असता, त्याने उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्याची कबुली दिली. उस्माननगर पोलीस ठाण्यातील अभिलेखाची पाहणी केली असता, त्याच्यावर गु.र.नं. १९४/२०२४, कलम ३१०(४), ३१०(५) BNS सह कलम ३/२५, ४/२५ भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यातही गुन्ह्याच्या तारखेपासून (२७ ऑक्टोबर २०२४) फरार असल्याचे समोर आले.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) मा. श्री. रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, पोहेकॉ. विशाल माळवे, पोकों. विष्णूकांत मुंडे, पोकों. राजीव घुले, पोकों. सुधाकर मरदोडे, पोकों. राहुल लाठकर, पोकों. अदनान पठाण, पोकों. नागनाथ चापके तसेच सायबर सेलचे पोहेकॉ. राजेंद्र सिटीकर व दीपक ओढणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे.
– वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

Next Post

स्टेट बँक कॅश फ्रॉडमधील फरार आरोपीचा राजस्थानमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post
स्टेट बँक कॅश फ्रॉडमधील फरार आरोपीचा राजस्थानमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

स्टेट बँक कॅश फ्रॉडमधील फरार आरोपीचा राजस्थानमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved