aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड एलसीबीची मोठी कारवाई जबरी चोरी स्नॅचिंग व चोऱ्या करणारी टोळी जेरबंद ३ गुन्हे उघड १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
June 16, 2026
in क्राईम
0
नांदेड एलसीबीची मोठी कारवाई जबरी चोरी स्नॅचिंग व चोऱ्या करणारी टोळी जेरबंद ३ गुन्हे उघड १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १६ जून प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि मालाची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी नांदेड पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत धाडसी कामगिरी करत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून मारहाण, जबरी चोरी आणि स्नॅचिंग करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ३ आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून १,१२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रामतीर्थ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ३ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पडला सापळा

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांनी आपल्या पथकाला सतर्क केले होते.
दिनांक १५.०६.२०२६ रोजी सपोनि रवि वाहुळे व त्यांचे पथक भागात पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. “शेख आरबाज, मतीन आणि आरफात सय्यद” हे तीन इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी ईदगाह जवळील वाजेगाव जाणारे पुलाजवळ येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या भागात सापळा रचला. संशयास्पदरित्या मोटार सायकलवरून आलेल्या तीन तरुणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१) सय्यद आरफात सय्यद हुसेन (वय २६ वर्षे, रा. मलनबाग बिल्डींग जवळ, देगलुर नाका, नांदेड).
२) मोहम्मद मतीन उर्फ तंडी मोहम्मद मुजफ्फर (वय २८ वर्षे, रा. हबिबिया कॉलनी, दारूल उलुम जवळ, देगलुर नाका, नांदेड).
३) शेख आरबाज शेख अजीज (वय २१ वर्षे, रा. नवी मस्जिद जवळ, हातई इतवारा, नांदेड).

१ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची कसून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल असा एकूण १,१२,०००/- (अक्षरी एक लाख बारा हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हायवेवरील प्रवाशांना लुटल्याची दिली कबुली

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक कबुली दिली. गेल्या दीड ते दोन महिन्यात या टोळीने:

  • बिलोली ते नरसी रोडवर
  • नरसी ते हैद्राबाद रोडवर मदनुर जवळ
  • नरसी ते नांदेड रोडवर नायगाव जवळ
  • मारताळा गावाच्या पुढे आल्यावर कांकांडीच्या जवळपास
    रस्त्याने जाणाऱ्या लोकांना अडवून, त्यांना बेदम मारहाण करून मोबाईल आणि पैसे जबरीने चोरल्याचे कबूल केले. या गुन्ह्यांच्या तपासाअंती खालील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत:
    १) पो.स्टे. रामतीर्थ: गु.र.नं. ७७/२०२६ कलम ३०३ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता.
    २) पो.स्टे. रामतीर्थ: गु.र.नं. ११८/२०२६ कलम ३०९ (४), ३(५) भारतीय न्याय संहिता.
    ३) पो.स्टे. नांदेड ग्रामीण: गु.र.नं. ६५१/२०२६ कलम ३०४ (२), ३(५) भारतीय न्याय संहिता.
    पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मार्गदर्शन व कामगिरी

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले, सपोनि श्री. रवि वाहुळे, तसेच पोहेकॉ/चंचलवार, उमर शेख, देविदास चव्हाण, पोकॉ/मोतीराम पवार, चापोहेकॉ/सिद्धार्थ सोनलसळे आणि सायबर सेलचे पोहेकॉ/दिपक ओढणे, पोहेकॉ/सिटीकर, मपोना/रेश्मा पठाण, पोकॉ/महेश बडगु यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
वृत्त संकलन व
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

आकर्षक हेडिंग उन्हाळी सुट्टीनंतर पोलीस कॉलनी शाळेत आनंदाची पाऊले शाळा पूर्वतयारी मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved