aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, September 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, September 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

Aawaz Times by Aawaz Times
May 26, 2026
in क्राईम
0
स्थानिक गुन्हे शाखेकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २७ मे प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ तीव्र गतीने राबवले जात आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका धडक कारवाईत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) आणि ४ जिवंत काडतुसे असा एकूण २७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एन.बी.एस. कॉलेज परिसरात पडला छापा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांचे पथक पेट्रोलिंगवर होते. यादरम्यान, एन.बी.एस. कॉलेजच्या बाजूला असलेल्या बंदाघाट रोडवर एक इसम बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगून उभा असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या परिसरात सापळा रचून छापा टाकला. संशयास्पदरीत्या आढळलेल्या हरप्रितसिंग ऊर्फ हॅप्पी महेंद्रसिंग सुनकेवार (वय ४१ वर्षे, रा. पांचाली हॉटेल जवळ, गुरुद्वारा चौरस्ता, नांदेड) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे मिळून आली.

तपासात समोर आले दुसऱ्या आरोपीचे नाव

पोलिसांनी आरोपी हरप्रितसिंग याच्याकडे या शस्त्राबाबत अधिक विचारपूस केली असता, हे अग्नीशस्त्र आणि काडतुसे त्याने तेजिंदरपालसिंग ऊर्फ सोनु भागसिंग लदड (वय २८ वर्षे, रा. गजानन महाराज मंदिर जवळ, मालेगाव रोड, नांदेड) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले.
या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. २४७/२०२६ नुसार कलम ३/२५ आणि ७/२५ भा.ह.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वजीराबाद पोलीस ठाण्यातील अंमलदार राजीव बोधगिरे (पोकॉ/ खंडणी विरोधी पथक, नांदेड) यांच्या रिपोर्टवरून नोंदवण्यात आली आहे.

या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सपोनि विठ्ठल घोगरे, पोकॉ/राजीव बोधगिरे, पोकॉ/गोविंद राठोड, पोकॉ/विठ्ठल वैद्य, पोकॉ/साहेबाराव कदम, पोकॉ/गणेश यादव आणि चापोकॉ/अकबर पठाण यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. एलसीबीच्या या धडक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले आहे.
– वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचा गुन्हेगारांवर सर्जिकल स्ट्राईक रात्रीच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये अनेक सराईत गुन्हेगार जेरबंद

Next Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
Next Post
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved