aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावरील खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या अवघ्या काही तासांतच कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
June 11, 2026
in क्राईम
0
सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावरील खून प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या अवघ्या काही तासांतच कारवाई
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ जून

(प्रतिनिधी, माधव वाघमारे): सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरगे पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून एका इसमाचा काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेऊन नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासांतच अत्यंत शिताफीने आरोपींना नांदेड मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.

किरकोळ वादातून घडला थरार

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १०.०६.२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास सोनखेड हद्दीतील मोरगे पेट्रोल पंपावर दोन इसम आले. त्यांनी तेथील कर्मचारी किफायात अली खाजा मोईनोद्दीन यांना “पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर किफायात अली यांनी “मी प्लंबर आहे, तुम्ही पेट्रोल पंपावर विचारपूस करा” असे सांगितले. याच कारणावरून त्यांच्यात अचानक वाद पेटला.
हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपींनी किफायात अली व साक्षीदार यांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत किफायात अली यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी महेश अशोकराव कोरे (पोउपनि, स्था.गु.शा. नांदेड) यांच्या रिपोर्टवरून सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२६, कलम १०३, ११८(१), ११५(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) श्री. सुरज गुरव यांनी फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांची वेगवेळगी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून पथकाला माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हे नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दबा धरून बसले आहेत. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१. पवन राजेभाऊ चौधरी (वय २३ वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, सोनखेड)
२. बालाजी शिवाजीराव मोरे (वय ३६ वर्षे, रा. बालाजी मंदिराजवळ, दगडगाव रोड, सोनखेड)
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोनखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अतुल भोसले, सोनखेडचे सपोनि भागवत नागरगोजे, स्था.गु.शा.चे सपोनि विठ्ठल घोगरे, पोउपनि महेश कोरे, पोउपनि साईनाथ पुयड, पोनि नागनाथ तुकडे आणि सोनखेड पोलीस स्टेशनच्या मपोउपनि वैशाली कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद केल्याबद्दल पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

Next Post

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved