aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, September 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, September 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

Aawaz Times by Aawaz Times
May 17, 2026
in क्राईम
0
लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १७ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे) 

लोहा शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घालण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने रविवारी एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ राबवून लोहा शहरातील तीन अवैध लॉजेसवर एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) आणि इतर विविध कलमांखाली एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे ‘निलय लॉज’वर छापा

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहा ते नांदेड रोडवर असलेल्या ‘निलय लॉज’मध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. १६ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी (कंधार) अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाई दरम्यान लॉजच्या काउंटरवर रामकिसन विठ्ठलराव ढगे (वय ४७, रा. लिंबोणी गल्ली, लोहा) हा मिळून आला. लॉजची पंचांसमक्ष तपासणी केली असता, तेथील तीन वेगवेगळ्या रूममध्ये तीन महिला आढळून आल्या. त्यांची चौकशी केली असता, लॉज मालक रामकिसन ढगे याच्या सांगण्यावरून येथे अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच या ठिकाणी दारू पिणाऱ्या पाच ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. निलय लॉजमधून ३,७१० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इतर दोन लॉजेसवरही कारवाई; नियमांचे उल्लंघन

या मोहिमेदरम्यान लोहा शहरातील इतर दोन लॉजेसवरही कारवाई करण्यात आली. ‘रणवीर लॉज’ आणि ‘आर्या लॉज’ या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची नोंदणी रजिस्टरला न करणे, त्यांची कोणतीही ओळखपत्रे न घेणे आणि नियमांचे सर्रास उल्लंघन करून रूम भाड्याने देणे, असे प्रकार उघडकीस आले. याप्रकरणी दोन्ही लॉजच्या मालक आणि व्यवस्थापकांवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल झालेले आरोपी:

१) रामकिसन विठ्ठलराव ढगे (वय ४७, निलय लॉज मालक)
२) गुलाब रशीद शेख (वय ३७, ग्राहक)
३) सोमनाथ गंगाधर जंगले (वय ३३, ग्राहक)
४) बालाजी दत्ता जाधव (वय ३४, ग्राहक)
५) आनंद प्रकाश श्रीमंगले (वय ३२, ग्राहक)
६) शिलानंद कमळाकर वारकरे (वय ३२, ग्राहक)
७) बालाजी सदाशिव जाधव (रा. डोंगरगाव, रणवीर लॉज मालक)
८) रफिक आमीर शेख (रा. खांबेगाव, रणवीर लॉज मॅनेजर)
९) अजय मारोती भिसे (रा. लोहा, आर्या लॉज मालक)
१०) माधव गणेश कंधारे (आर्या लॉज मॅनेजर)

या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कामगिरी

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, पो.नि. चंद्रकांत जाधव (कंधार), पो.नि. एन. एस. आयलाने (लोहा), सोपनि केदार, पोउपनि संतोष पाटील, पोउपनि स्नेहा पिंपरखेडे, मपोअं चोपवाड, श्रीमंगले, सुप्रिया मगर, श्रीदेवी मारवाडे, सविता जोंधळे, पुनम बेटकर तसेच सहा.पो.उप.निरी. किरपणे, पोहवा. सदाशिव गित्ते, पो.हवा. नारायण कदम आणि पोलीस अंमलदार कैलास गिरे, सतीश बलुरे, अतुल क्षीरसागर, घोरबांड, शिवाजी चौकटे व साजीद शेख यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या यशस्वी कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहा पोलीस करत आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडात विद्युत नगर मध्ये CBI ची धाड ५ लाखांत गुण वाढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Next Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत ३० लाख ६३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तेलंगणाचा आरोपी गजाआड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक
क्राईम

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या
क्राईम

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई
क्राईम

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
Next Post
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत ३० लाख ६३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तेलंगणाचा आरोपी गजाआड

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन' अंतर्गत ३० लाख ६३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तेलंगणाचा आरोपी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत अटक

September 25, 2026
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी नांदेड पोलिसांचा कडक पवित्र्या

September 24, 2026
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई

September 24, 2026
तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved