aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, June 22, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, June 22, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडात विद्युत नगर मध्ये CBI ची धाड ५ लाखांत गुण वाढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Aawaz Times by Aawaz Times
May 18, 2026
in Uncategorized
0
पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडात विद्युत नगर मध्ये CBI ची धाड ५ लाखांत गुण वाढवल्याचा धक्कादायक प्रकार उघड
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १७ मे प्रतिनिधी
देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. नांदेड शहरातील विद्युत नगर भागातील एका कदम  कुटुंबाची मुली ची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कसून चौकशी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मूळचे अवघे १२० गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला तब्बल ५ लाख रुपयांच्या देवाणघेवाणीतून ५६० गुण मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार या चौकशीतून समोर येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत नगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबियांच्या पाल्याने संबंधित परीक्षेत भाग घेतला होता. अधिकृत मूल्यमापनानुसार या विद्यार्थ्याला केवळ १२० गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, पेपर फुटी आणि गुणांच्या फेरफार करणाऱ्या रॅकेटशी संधान साधून कदम कुटुंबियांनी तब्बल ५ लाख रुपयांची लाच दिली. या पैशांच्या जोरावर मूळ गुणांमध्ये तब्बल ४०० गुणांची अवैध वाढ करून निकाल ५६० गुण असा लावण्यात आला.
या मोठ्या गैरव्यवहाराचा सुगावा लागताच, सीबीआयच्या पथकाने थेट नांदेड गाठले आणि विद्युत नगरमधील कदम कुटुंबियांच्या घरावर धडक दिली. या कुटुंबाची तासनतास कसून चौकशी करण्यात आली असून, अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि संशयास्पद बाबी सीबीआयच्या हाती लागल्याचे समजते.

आम्ही कसं करायचं? गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल

या धक्कादायक प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

“दिवस-रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून आम्ही अभ्यास करतो. गरीब कुटुंबातील मुलं क्लास लावू शकत नाहीत, तरीही स्वतःच्या जिद्दीवर उत्तम गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण जर पैशांच्या जोरावर १२० चे ५२० गुण होणार असतील, तर आमच्या हुशारीला काय किंमत? गरीबाच्या मुलांनी नक्की करायचं काय?”
एका संतप्त विद्यार्थ्याची प्रतिक्रिया

पैशांच्या बळावर गुण खरेदी करणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे खरोखरच हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. अशा शिक्षणसम्राटांवर आणि दलालांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या प्रकरणात नांदेडमधील आणखी काही जणांचे हात गुंतले आहेत का? सीबीआयच्या चौकशीत पुढे काय निष्पन्न होते? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक २५ दिवसांत ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू
Uncategorized

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

June 16, 2026
भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
Uncategorized

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

June 14, 2026
नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 12, 2026
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड
Uncategorized

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगार भंडारी गजाआड

May 29, 2026
मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद
Uncategorized

मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे शेतात बेकायदेशीर गांजाची लागवड तब्बल ५ किलो गांजासह ६७ वर्षीय आरोपी जेरबंद

May 23, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा
Uncategorized

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जुगार अड्ड्यावर छापा

May 19, 2026
Next Post
लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

लोहा शहरात तीन अवैध लॉजेसवर पोलिसांची धडक कारवाई १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

नांदेडमध्ये थरार खडकपुरा येथील खून प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या ४ तासांत बेड्या

June 21, 2026
नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

नांदेड़ में खूनी खेल जमीन विवाद में शेख शमीम की तलवार और गोली मारकर बेरहमी से हत्या इलाके में दहशत

June 21, 2026
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 21, 2026
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

June 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved