aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लॅश आऊट दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश गावठी पिस्तुलसह पाच आरोपी गजाआड

Aawaz Times by Aawaz Times
April 28, 2026
in क्राईम
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २८ एप्रिल (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ला मोठे यश आले आहे. शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्रांसह १ लाख ३२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

नांदेड शहरात २७ एप्रिलच्या रात्री ११ वाजेपासून ते २८ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कामठा बाजार ते गाडेगाव जाणारे रोडवरील रेल्वे पटरीजवळील उड्डाणपुलाखाली काही संशयित तरुण घातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले आहेत.

पोलिसांची धाडसी कारवाई

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस, लोखंडी खंजर, लोखंडी गजाळी, दोरी, मिरची पावडर आणि मोबाईल असा एकूण १,३२,१६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तातडीने हा सर्व माल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

१. योगेश उर्फ गोट्या चंदर सोनावणे (रा. हर्षनगर, नांदेड)
२. राहुल नागनाथ काळे (रा. साठे चौक, खोब्रागडे नगर, नांदेड)
३. राम ज्ञानेश्वर कांबळे (रा. चिखलवाडी, मुदखेड)
४. श्रावण रामजी जोंधळे (रा. नवीन आबादी, मुदखेड)
५. मनोज साहेबराव कदम (रा. मगनपुरा, नवीन मोंढा, नांदेड)

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) आणि शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलिस अधीक्षकांनी या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. या कारवाईमुळे नांदेडमधील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट  १६ दिवसांत १४८ हून अधिक गुन्हेगारांवर दणकेबाज कारवाई

Next Post

नांदेडमध्ये मटका अड्डयावर विशेष पथकाचा मोठा छापा ९२ हजारांच्या मुद्देमालासह १३ जणांवर कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

नांदेडमध्ये मटका अड्डयावर विशेष पथकाचा मोठा छापा ९२ हजारांच्या मुद्देमालासह १३ जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved