aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा नांदेडमध्ये शुभारंभ

Aawaz Times by Aawaz Times
January 1, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. १ जानेवारी : (प्रतिनिधी) माधव वाघमारे

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या रस्ते अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी देशभर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. याच पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आदी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालना मुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली. मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ५.०४ टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अपघातांमधील मृत्यूसंख्या ही अनेक गंभीर गुन्ह्यांतील मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे सांगून, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात ‘रस्ते की पाठशाला’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक प्रदीप नन्नावरे यांनी “मी राष्ट्रीय महामार्ग बोलतोय” या विषयावर आधारित उद्बोधनात्मक गीताचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, निवासी वैद्यकीय अधिकारी गुट्टे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गुरू गोबिंदसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) नांदेड येथील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन वितरक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असे एकूण २७५ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केले, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मनपा निवडणूक रणधुमाळीला सुरुवात  ८७८ उमेदवार रिंगणात ५९ अर्ज बाद

Next Post

समन्वयातूनच विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल  सीईओ मेघना कावलींचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post

समन्वयातूनच विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल  सीईओ मेघना कावलींचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved