नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) दिल्लीच्या 19 सप्टेंबर 2025 च्या कार्यालयीन ज्ञापनानुसार आधार नोंदणी, अपडेट व अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण यासाठी नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसारच नागरिकांकडून शुल्क आकारणी करावी, अन्यथा जास्तीचे शुल्क घेतल्यास संबंधित आधार केंद्र चालकाविरुद्ध थेट तक्रार दाखल करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
कोणत्या सेवेसाठी किती शुल्क तपशील
सेवा शुल्क नवीन आधार नोंदणी निशुल्क बालआधार – 5 वर्षानंतर बायोमेट्रिक अद्यावत करणे निशुल्क 5 ते 7 वयोगट अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट निशुल्क 15 ते 17 वयोगट अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट निशुल्क 7 ते 15 वयोगट बायोमेट्रिक अद्यावत (1 जानेवारी 2025 पासून 1 वर्ष) निशुल्क 17 वर्षांवरील बायोमेट्रिक अद्यावत ₹125 (GST सह) बायोमेट्रिक + डेमोग्राफिक अपडेट ₹125 (GST सह) डेमोग्राफिक अपडेट (नाव/पत्ता/मोबाईल/लिंग इ.) एकापेक्षा जास्त बदल ₹75 (GST सह) POA/POI दस्तावेज अपलोड / बदल ₹75 (GST सह) SSUP (my Aadhaar Portal) द्वारे POA/POI अपडेट ₹75 (GST सह) ई-आधार कलर प्रिंट ₹40 (GST सह) होम एन्लोलमेंट / घरून आधार नोंदणी सेवा ₹700 (GST सह)
तक्रार कुठे करायची?
जास्तीचे पैसे घेतल्यास नागरिकांनी खालील ठिकाणी तक्रार करू शकतात :
- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड – D.I.T. कक्ष, 2रा मजला
- संबंधित तालुक्याचे तहसीलदार कार्यालय
- UIDAI टोल फ्री क्रमांक : 1947
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना Mask Aadhaar वापरण्याचे आवाहन केले असून Physical Aadhaar चा अनावश्यक वापर टाळावा, ज्यामुळे आधार क्रमांकाचा गैरवापर रोखता येईल.
नव्या शुल्काचा प्रसार सर्व नागरिकांपर्यंत व्हावा व आधार केंद्रांवर पारदर्शकता राहावी, हे या निर्णयामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.












