aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-२०२५ अंतर्गत वडवणा खडकी ग्रामपंचायतीत विकासकामांचा धडाका

Aawaz Times by Aawaz Times
December 25, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |२५ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत ग्रामपंचायत वडवणा/खडकी, ता. जि. नांदेड येथे दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विविध विकासकामांचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदेड श्री. प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी श्री. व्ही. बी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. नारायण पाटील कदम, सरपंच प्रतिनिधी श्री. संजय पोहरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. के. एस. तिडके, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, शिक्षकवृंद, आशा वर्कर, मनरेगा अंतर्गत एपीओ श्री. शुभम कांबळे, श्री. नागेश फुलारी, तांत्रिक अधिकारी श्री. कदम तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी जलतारा शोषखड्याचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. जलसंवर्धनासाठी ५० जलतारा शोषखड्यांची कामे हाती घेण्यात आली असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गटविकास अधिकारी श्री. प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते वृक्षलागवड करून तब्बल २०० वृक्ष लावण्यात आले.

ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी सेग्रीगेशन शेडचे बांधकाम सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली तसेच शाळकरी मुलांना मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामपंचायतीत लोकवर्गणीतून शाळकरी मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

गावातील सुरक्षिततेसाठी मुख्य चौक व इतर ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. महिला व पुरुषांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी इमारत तसेच स्मशानभूमीची रंगरंगोटी करण्यात आली. माझी मुलगी माझा अभिमान या उपक्रमांतर्गत गावातील सर्व घरांवर मुलींची नावे लावण्यात आली असून गावाच्या दर्शनी भागात सुविचार व प्रबोधनात्मक स्लोगन लिहिण्यात आले.

ऊर्जासंवर्धनाच्या दृष्टीने ग्रामपंचायत व शाळा इमारतींवर सौर पॅनल बसवून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याबद्दल गटविकास अधिकारी श्री. प्रवीण सुरडकर यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे वडवणा/खडकी गावाचा सर्वांगीण विकास होत असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

एचआरए मिळूनही कर्मचाऱ्यांचा अपडाऊन सुरूच

Next Post

नांदेडमध्ये मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
Next Post

नांदेडमध्ये मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved