aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, April 13, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, April 13, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेचा थरार ३८ बैलजोड्यांचा सहभाग

Aawaz Times by Aawaz Times
December 25, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. २५ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आज पारंपरिक शंकरपट (बैलजोडी बैलगाडी शर्यत) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या एकूण ३८ बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत माळेगावच्या माळरानावर प्रचंड थरार निर्माण केला. स्पर्धा पाहण्यासाठी भाविक व नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उपअभियंता राठोड, दिनेश महेर, चंद्रकांत जाधव, संजय नीलपत्रेवार, आईलाने, चव्हाण, नायब तहसीलदार मेकाले आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान वेगवान, शिस्तबद्ध आणि ताकदवान बैलजोड्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक फेरीदरम्यान टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि जल्लोषात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शेतकरी जीवनशैलीचे जिवंत दर्शन घडविणारी ठरली.

या स्पर्धेत कोंडीबा मोहन कोरडे यांच्या बैलजोडीने अवघ्या ४ सेकंद ३९ पॉईंटमध्ये शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. अमोल देविदास राठोड यांनी ४ सेकंद ४२ पॉईंटमध्ये धाव घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अश्विनी दिलीपराव मंदाडे आणि बालाजी माणिकराव कदम यांना विभागून देण्यात आले. या दोन्ही बैलजोडींनी ४ सेकंद ४३ पॉईंटमध्ये शर्यत पूर्ण केली.

प्रथम क्रमांकास ६१ हजार ५१ रुपये, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्रासह पारितोषिके उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर मानधन देण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी शंकरपटसारख्या पारंपरिक क्रीडा प्रकारांमुळे ग्रामीण संस्कृती जिवंत राहते, असे मत व्यक्त केले. शेतकरी आणि बैलगाडीप्रेमींसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून परंपरा, मेहनत आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव असल्याचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितले.


चौकट : बैलगाडी शर्यतीचे निकाल (वेळ – सेकंद/पॉईंट)

  • कोंडीबा कोरडे – ४.३९
  • अमोल राठोड – ४.४२
  • अश्विनी मंदाडे – ४.४३
  • बालाजी कदम – ४.४३
  • प्रदीप सानप – ४.५५
  • प्रतीक दळवी – ४.६१
  • भगवान जाधव – ४.६१
  • संदीप कल्याणकर – ४.६१
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पुण्यात खून करून नांदेड ग्रामीण हद्दीत दडपण बसलेले दोन आरोपी ताब्यात

Next Post

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved