aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेडचे सुप्रसिद्ध प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव सन्मान’ मिळाल्याबद्दल सत्कार

Aawaz Times by Aawaz Times
December 26, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | २६ डिसेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे
कविवर्य नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव सन्मान पुरस्कार’ यंदा नांदेडचे ज्येष्ठ प्रकाशक व साहित्यसेवक निर्मल कुमार सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या ५५ वर्षांच्या अखंड साहित्यसेवेचा आणि ‘अक्षरनातीचा’ या महत्त्वपूर्ण साहित्यकृतीचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज नांदेड येथील त्यांच्या प्रकाशन कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन निर्मल कुमार सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सत्कारप्रसंगी मातोश्री भागाबाई विठ्ठलराव डोंगरे प्रतिष्ठान, उमरीचे सर्वेसर्वा मा. नागोराव डोंगरे तसेच अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष मा. सदानंद सपकाळे हे विशेष उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की,
“निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ साहित्य प्रकाशन क्षेत्रात अविरत कार्य करत अनेक नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांचे कार्य केवळ प्रकाशनापुरते मर्यादित नसून, ते मराठी साहित्यसंस्कृती जपणारे व वृद्धिंगत करणारे आहे.”

‘अक्षरनातीचा’ ही साहित्यकृती मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करणारी असून, तिच्या माध्यमातून साहित्य, समाज आणि संस्कृती यांचे अतूट नाते प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. अशा मोलाच्या कार्याची दखल घेऊन देण्यात आलेला पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव सन्मान हा अत्यंत योग्य व प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,
“हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, माझ्यासोबत वाटचाल करणाऱ्या लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमींचा आहे. पद्मश्री नारायण सुर्वे यांचे विचार व संघर्ष सदैव प्रेरणादायी राहिले असून, त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अत्यंत मोठा सन्मान आहे.”

हा कार्यक्रम अत्यंत आपुलकीच्या, उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. उपस्थित साहित्यप्रेमींनी निर्मल कुमार सूर्यवंशी यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

बोधडी येथे किर्तनकेसरी ह.भ.प. वसंतबुवा मंडलिक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न

Next Post

नांदेड ग्रामीणमध्ये गुन्हेगारीवर कडक कारवाई गंभीर गुन्ह्यातील आरोपीला MPDA अंतर्गत स्थानबद्ध करून लातूर येथे रवानगी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
आपलं नांदेड

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
Next Post

नांदेड ग्रामीणमध्ये गुन्हेगारीवर कडक कारवाई गंभीर गुन्ह्यातील आरोपीला MPDA अंतर्गत स्थानबद्ध करून लातूर येथे रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved