aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

हिंद की चादर शहिदी समागमासाठी नांदेड सज्ज ८ ते १० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित

Aawaz Times by Aawaz Times
January 19, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : १९ जानेवारी (प्रतिनिधी माधव वाघमारे)
श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून, या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी देश-विदेशातून ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होतील, अशी माहिती आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक आयोग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे “हिंद की चादर” या संकल्पनेवर आधारित श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड हे सिख धर्मातील पवित्र तख्त “हजूर साहिब” असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे आयुक्त पापळकर यांनी सांगितले.

या भव्य समागमास देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. सामाजिक एकोपा, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी तब्बल ५२ एकर क्षेत्रावर भव्य मंडप उभारण्यात येणार असून, नांदेड टेंट सिटी, ३५० स्टॉल्स, भाविकांसाठी निवास, भोजन व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आठ ते दहा ठिकाणी लंगर व्यवस्था, पिण्याचे पाणी, अंतर्गत दळणवळण यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितले की, देशभरातून भाविक व मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्याने ५ विशेष विमानसेवा व ५ विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी नांदेड, नागपूर व मुंबई येथे समन्वय साधण्यात आल्याची माहिती दिली. दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंडवर हा भव्य कार्यक्रम होणार असून, संत-महंत, विविध धर्मगुरू, मान्यवर आणि लाखो भाविक उपस्थित राहतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी सुवर्णसंधीमिनी ट्रॅक्टर व उपसाधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

नांदेडमध्ये ‘हिंद-दी-चादर’चा ऐतिहासिक सोहळा ५२ एकरात भव्य शहीदी समागम, ८ ते १० लाख भाविकांची अपेक्षा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

July 31, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
Next Post

नांदेडमध्ये ‘हिंद-दी-चादर’चा ऐतिहासिक सोहळा ५२ एकरात भव्य शहीदी समागम, ८ ते १० लाख भाविकांची अपेक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved