aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

लोकसेवा हक्क कायद्याची पोलिसांकडून काटेकोर अंमलबजावणी नांदेडमध्ये आयुक्त पोलीस अधिक्षक आढावा बैठक

Aawaz Times by Aawaz Times
February 12, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | दि. १२ फेब्रुवारी

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळावी, यासाठी नांदेड जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेकडून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. लोकसेवा हक्क आयोगाचे मा. आयुक्त श्री. किरण जाधव (सेवानिवृत्त भापोसे) यांनी आज नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच गोपनीय शाखेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पोलिस विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मा. आयुक्त श्री. किरण जाधव यांनी स्पष्ट केले की, अधिनियमानुसार शासनाने जाहीर केलेल्या सेवांची पूर्तता संबंधित विभागाने विहित कालमर्यादेत करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. सेवा देण्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार धरले जाऊ शकतात, अशी तरतूद अधिनियमात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सेवा अर्ज प्राप्त झाल्यानंतर नोटीस ठराविक मुदतीत निकालात काढणे, अपील प्रक्रिया पारदर्शक ठेवणे तसेच नागरिकांना अचूक माहिती देणे या बाबींवर विशेष भर देण्यास सांगण्यात आले. पोलिस विभागाकडील पासपोर्ट पडताळणी, ऑनलाइन चारित्र्य पडताळणी व इतर सेवांमध्ये चांगली अंमलबजावणी केल्याबद्दल मा. आयुक्तांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. आबिनाश कुमार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत व नागरिकांच्या तक्रारींवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा संकल्प पोलिस प्रशासनाने यावेळी व्यक्त केला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत नांदेड ग्रामीण पोलिसांची ऑपरेशन फ्लश आउट मध्ये मोठी कामगिरी

Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी स. हरजिंदरसिंघ संधू यांची नियुक्ती

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी स. हरजिंदरसिंघ संधू यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved