aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध रेती उपसा करणारे १० रेती माफिया गजाआड २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
June 1, 2026
in क्राईम
0
अवैध रेती उपसा करणारे १० रेती माफिया गजाआड २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १ जून प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या १० रेती माफियांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ कोटी १५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

गोदावरी पात्रात मध्यरात्री छापा

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अवैध रेती उपशावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाला गंगा बेट शिवारातील गोदावरी नदी पात्रात चोरून अवैध रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३१ मे २०२६ रोजी रात्री १०:१० वाजेच्या सुमारास गंगाबेट शिवारात सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात हायवा आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध रेती उपसा व वाहतूक करताना आरोपी रंगेहात सापडले.

२ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

या धडक कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • हायवा गाड्या: एक टाटा कंपनीचा हायवा (क्र. MH 26CH 9400) ज्यामध्ये ५ ब्रास रेती होती (किंमत रु. ४५,२५,०००) आणि एक भारत बेंझ कंपनीचा हायवा (क्र. MH14MH8849, कीमत रु. ४५,००,०००).
  • ट्रॅक्टर: एक लाल व पिवळ्या रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली (किंमत रु. ११,००,०००).
  • बोटी व इंजिन: दोन मोठ्या लोखंडी बोटी (किंमत रु. ३०,००,०००), दोन फायबर बोटी (किंमत रु. २०,००,०००) आणि ११ इंजिन (किंमत रु. ३३,००,०००).
  • रेती व इतर साहित्य: पाण्यात तरंगणारे ५२ तराफे आणि त्यावर असलेली १०४ ब्रास रेती (किंमत रु. ३१,२०,०००) तसेच अंदाजे ४ ब्रास रेती (किंमत रु. ८०,०००).
    पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २,१५,६५,०००/- रुपयांचा माल जप्त केला असून काही साहित्य जागीच नष्ट केले आहे.

१० जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोकों/२१५९ हनमंत उत्तमराव तेलंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये बालाजी अशोक सांगळे (रा. बामणी), बळीराम गोवर्धन चव्हाण (रा. लिंबोटी तांडा), अशोक मोरे (रा. सोनखेड), अतुल प्रभाकर गच्चे (रा. जवळा) आणि इतर ६ अनोळखी इसमांचा समावेश आहे.
सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९, १५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन व कौतुक

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि बाबुराव चव्हाण, पोहेकॉ/अर्जुन मुंडे, पोकों/संतोष पवार, पोकों/शेख असीफ, पोकों/गवेद्र सिरमलवार, पोकों/विष्णु कल्याणकर, पोकों/शेख जमीर आणि पोकों/शिरगिरे यांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड मनपात अभिवादन

Next Post

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा दणका

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा दणका

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा मोठा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved