नांदेड ५ जून प्रतिनिधी
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत धडक कारवाई करत पोलिसांनी ५ फरार आरोपींना बिलोली ते कुंडलवाडी रोडवरील एका झुडपाच्या आडोशातून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आणि फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना दिले होते. या आदेशानुसार एलसीबीच्या पथकांनी जिल्ह्यात पेट्रोलिंग वाढवली होती.
दरम्यान, ५ जून २०२६ रोजी पोउपनि. महेश कोरे व त्यांच्या पथकाला अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६६३/२०२६ (कलम १०३(१), १०९(१), ३(५) भा.न्या.सं. व सह कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम) मधील फरार आरोपी हे बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांच्या आडोशाला लपून बसले आहेत.
पाचही आरोपी जेरबंद
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सदर खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
अटकेतील आरोपींची नावे (सर्व रा. विष्णुपूरी, ता. जि. नांदेड):
१. प्रविण एकनाथ हंबर्डे (वय २३ वर्षे)
२. चैतन्य संजय पांचाळ (वय १८ वर्षे)
३. विनायक उर्फ सुरज बळीराम तांगडे (वय १९ वर्षे)
४. अरीफ खमर पाशा शेख (वय १८ वर्षे)
५. प्रथमेश तुकाराम कडेकर (वय १९ वर्षे)
अटकेनंतर पाचही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि. विठ्ठल घोगरे, पोउपनि. महेश कोरे, पोउपनि. साईनाथ पुयड, पोउपनि. मिलींद सोनकांबळे तसेच सायबर सेलचे पोलीस कर्मचारी महेश बडगु, सिटीकर आणि ओढणे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या उत्कृष्ट आणि धडक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक साहेबांनी संपूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.
विशेष वृत्त प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












