aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, November 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, November 8, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

मोक्का अंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात एलसीबीची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
June 5, 2026
in क्राईम
0
मोक्का अंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात एलसीबीची धडक कारवाई
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ५ जून प्रतिनिधी
नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (MCOCA) च्या गंभीर गुन्ह्यातील बऱ्याच दिवसांपासून पाहिजे असलेला आणि फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) जाळ्यात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत कारवाई

नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. या ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांना निर्देशित करण्यात आले होते.

म्हाळजा माळटेकडी परिसरात रचला सापळा

दिनांक ०४/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे व त्यांचे पथकातील अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, विमानतळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील फरार आरोपी सोहेल खाँन उर्फ चिंधी फेरोजखाँन पठाण (वय २५ वर्षे, व्यवसाय- बेकार, रा. बालाजीनगर हिंगोली नाका, नांदेड) हा सध्या ‘म्हाळजा माळटेकडी’ या भागात फिरत आहे.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तात्काळ या परिसरात कसून शोध घेतला आणि सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, तो महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधील फरार/पाहिजे असलेला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्याची पार्श्वभूमी व कलमे

पकडण्यात आलेल्या आरोपीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८४/२०२६ नुसार खालील कलमांखाली गुन्हा दाखल आहे:

  • भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १०९, ३५२, ६१(२)(अ), ३(५)
  • सह कलम: ३(१)(II), ३(२), ३(३), ३(४) (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ – मोक्का)

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा.श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा.श्री. सुरज गुरव यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, रितेश कुलथे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, शेख अझरोद्दीन, अनिल बिरादार (सर्व स्था.गु.शा. नांदेड), तसेच सायबर सेल नांदेडचे राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी बजावली आहे.
वृत्त संकलन व संपादन
प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

ऑपरेशन क्रॅकडाऊन २ गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसांसह ३ आरोपी जेरबंद ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेड पोलिसांची मोठी कारवाईग्रामीण भागातील खुनाच्या गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
नांदेड पोलिसांची मोठी कारवाईग्रामीण भागातील खुनाच्या गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाईग्रामीण भागातील खुनाच्या गुन्ह्यातील ५ फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved