aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल

Aawaz Times by Aawaz Times
June 21, 2026
in क्राईम
0
सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २१ जून प्रतिनिधी
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या आणि दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी जोरदार बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत एकाच दिवशी तब्बल १६ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ अन्वये धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार, पथक प्रमुख सपोनि श्री. एन. जी. पोमनाळकर व चार्ली पोलीस अंमलदार यांच्या पथकाने २० जून २०२६ रोजी नांदेड शहरात ही धडक मोहीम राबवली.

विविध भागात झालेली कारवाई खालीलप्रमाणे

  • भाग्यनगर परिसर (०७ इसमांवर कारवाई)
    सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक १ आणि ३ मधील पोलीस अंमलदार व बिट मार्शल पेट्रोलिंगवर असताना त्यांना छत्रपती चौक, सम्राट चौक आणि सत्कार वाईन शॉप परिसरात ७ जण मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील वाईन शॉप, हॉटेल्स, शाळा आणि कॉलेज परिसराचीही तपासणी करण्यात आली.
  • नांदेड ग्रामीण (०१ इसमावर कारवाई)
    चार्ली क्रमांक २ च्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान गोपाळ चावडी येथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम ११०/११७ अन्वये कारवाई केली.
  • इतवारा भाग (०१ इसमावर कारवाई)
    जुना मोंढा परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका मद्यपीवर चार्ली क्रमांक २ च्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला.
  • दामिनी पथकाची कारवाई (०८ इसमांवर कारवाई)
    महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या दामिनी पथकाने विसावा गार्डन आणि महात्मा फुले शाळा समोर आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या ८ जणांना रंगेहात पकडले. या सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मपोका अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाईन शॉप आणि शैक्षणिक संस्थांची तपासणी

या मोहिमेदरम्यान केवळ हुल्लडबाजांवर कारवाई करून पोलीस थांबले नाहीत, तर शहरातील विविध भागातील दारूची दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स, तसेच शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेसच्या परिसराला भेटी देऊन कडक तपासणी करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा

“नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, तसेच दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे कृत्य करणाऱ्यांवर यापुढेही अत्यंत कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी नागरिकांना व व्यावसायिक चालकांना दिला आहे.

– विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे (नांदेड)

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Next Post

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post
रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा छापा १ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved