aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव

Aawaz Times by Aawaz Times
July 31, 2026
in आपलं नांदेड
0
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशात १२ वी रँकिंग महाराष्ट्रातील एकमेव
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ३१ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (NGUR) २०२६ मध्ये ९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’ मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या या क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करत विद्यापीठाने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांच्या श्रेणीत या यादीत स्थान मिळवणारे स्वारातीम विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ‘10th NYC Green School Conference 2026’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

१० प्रमुख स्तंभांवर कठोर मूल्यांकन

विद्यापीठाचे मूल्यांकन केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न ठेवता पर्यावरणीय प्रशासन (Sustainability Governance), जैवविविधता, Carbon & Climate Action, Green Infrastructure व ऊर्जाक्षमता, संशोधन, जलव्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, कचराव्यवस्थापन व Circular Economy आणि सामुदायिक सहभाग या १० प्रमुख घटकांच्या आधारे करण्यात आले. ९० ते ९४.९९ गुणांच्या श्रेणीत हे विद्यापीठ ९२.५ गुण मिळवून ‘Gold Rating’ चे मानकरी ठरले.

विद्यापीठाचे प्रमुख पर्यावरणपूरक उपक्रम:

  • सौर ऊर्जा: परिसरात २८७ KWH क्षमतेचे सौर पॅनेल्स बसवले असून विद्यापीठाची ४०% वीज गरज याद्वारे भागवली जाते.
  • जैवविविधता व हरित परिसर: ५५० एकरांचा हरित परिसर, सुमारे ३५ हजार वृक्ष, १० हेक्टरवर Biodiversity Park आणि ४ हेक्टरवर Botanical Garden.
  • जल व कचरा संवर्धन: Rain Water Harvesting प्रणाली, कचऱ्याचे शाश्वत पृथक्करण व पुनर्वापर.
  • संशोधन व अभ्यासक्रम: SDG-संरेखित विषय, Green Technology वर संशोधन प्रकल्प व पर्यावरण अभ्यासक्रमांचा समावेश.

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे वक्तव्य

“उत्कृष्टता आणि शाश्वतता (Sustainability) या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात, हे विद्यापीठाने सिद्ध केले आहे. हे यश संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. येत्या काळात १०० टक्के हरित ऊर्जा आणि Net-Zero चे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठ अधिक ठोस पावले उचलणार आहे,” असा विश्वास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला.

सामूहिक प्रयत्नांचे फलित

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, IQAC संचालक व नोडल अधिकारी डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, समन्वयक डॉ. अविनाश कदम, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. शैलेश वाढेर, तानाजी हुसेकर, रामदास पेदेवाड आणि उद्यान विभागाच्या पथकाने यात मोलाचे योगदान दिले. तसेच माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व माजी कुलसचिव सर्जेराव शिंदे यांनी रचलेल्या भक्कम पायाभरणीचाही यात मोठा वाटा राहिला आहे.
विद्यापीठाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या सदस्यांसह शैक्षणिक व प्रशासकीय वर्गातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

Next Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई अट्टल चोरट्याला अटक १ लाख २० हजार रुपयांच्या ३ दुचाकी जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प
आपलं नांदेड

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

August 3, 2026
नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण
आपलं नांदेड

नांदेड दक्षिण मतदारसंघात एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात 99 टक्के काम पूर्ण

August 3, 2026
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

August 3, 2026
क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

क्रांतिसिंह नाना पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेत विनम्र अभिवादन

August 3, 2026
नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलातील १६ अधिकारी व अंमलदार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त भावूक वातावरणात सत्कार व निरोप

July 31, 2026
महाराष्ट्रातील अकृषिक विद्यापीठांमध्ये एकमेव स्थान न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मानाचे निमंत्रण
आपलं नांदेड

महाराष्ट्रातील अकृषिक विद्यापीठांमध्ये एकमेव स्थान न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मानाचे निमंत्रण

July 31, 2026
Next Post
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई अट्टल चोरट्याला अटक १ लाख २० हजार रुपयांच्या ३ दुचाकी जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई अट्टल चोरट्याला अटक १ लाख २० हजार रुपयांच्या ३ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved